Madha Lok Sabha : उदयनराजेंसाठी मनसेचं इंजिन सुसाट, पण माढ्याबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात!

लोकसभेच्या माढा मतदारसंघाबाबत (Madha Lok Sabha) देशात आणि राज्यात चर्चा आहे.
Raj Thackeray MNS
Raj Thackeray MNSesakal
Updated on
Summary

भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे.

गोंदवले : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला (BJP) पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे. त्यानुसार सातारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासाठी मनसेचे (MNS) इंजिन सुसाट झाले आहे; परंतु माढा मतदारसंघात मात्र, सातारा जिल्ह्यातील मनसेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray MNS
काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार निपाणीत; म्हणाले, 'मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार'

लोकसभेच्या माढा मतदारसंघाबाबत (Madha Lok Sabha) देशात आणि राज्यात चर्चा आहे. माढा मतदारसंघाची निर्मिती झाल्यावर पहिल्यांदाच येथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निवडून गेले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ देशपातळीवर लक्षवेधी ठरला. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे.

Raj Thackeray MNS
Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

या वेळी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्हीही पक्षांचे मित्रपक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.राज्यात मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी मनसेने सर्वस्व पणाला लावले आहे.

Raj Thackeray MNS
Eknath Shinde : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रवेशबंदी करा'; मराठी भाषक, म. ए. समिती आक्रमक, काय आहे कारण?

कऱ्हाड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेऊन मनसेने शक्तिप्रदर्शन केले; परंतु मनसे माढा मतदारसंघात अद्याप चार्ज न झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विधानसभेच्या माण-खटाव व फलटण मतदारसंघांत मनसेचे सुमारे अठरा ते वीस हजार मतदार असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत; परंतु अद्यापही माढ्यात मनसेने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने ही हक्काची मते नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार? याबाबत चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.