Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा दावा का ठरला फोल? भाजप 303 पार वर होते ठाम

आपला हा दावा चुकूच शकत नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं होतं.
Prashant Kishor
Prashant Kishor

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला २०१९मध्ये मिळालेल्या ३०३ जागांपेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. हा दावा करताना त्यांनी विविध मुद्द्यांचे दाखले केले होते. आपला हा दावा चुकूच शकणार नाही, अशा प्रकारे त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला होता. पण प्रत्यक्षात जेव्हा ४ जून रोजी भारतीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांचा हा दावा सपशेल चुकल्याचं दिसून आलं. पण त्यांचा हा ओव्हर कॉन्फिडन्स का चुकला? जाणून घेऊयात. (Where did Prashant Kishor over confidence go wrong he was claimed BJP got more than 303 seats)

Prashant Kishor
Narendra Modi: एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड; राष्ट्रपतींनी दिली वेळ, ७ जूनला सत्तास्थापनेचा दावा करणार

निवडणूक निकालाच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अर्थात लोकसभेचं पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर प्रशांत किशोर यांनी विविध माध्यमांना मुलाखती द्यायला सुरुवात केली होती. खरंतर भाजपच्या प्रचाराची सुरुवात ४०० पारनं झाली होती. पण चौथ्या टप्प्यापर्यंत भाजपविरोधातील जनतेचा सूर पाहता भाजपनं हा प्रचार करणं थांबवलं होतं. स्वतः नरेंद्र मोदींनी देखील आपल्या भाषणातून हे सांगणं बंद केलं होतं. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचं मांडलेलं आगामी निकालाच्या गणिताची देशभरात चर्चा सुरु झाली.

Prashant Kishor
Jitendra Awhad: एक गुगली अन् 2 विकेट! आव्हाडांच्या ट्विटनं खळबळ

योगेंद्र यादवांचं विश्लेषण खरं ठरलं

दरम्यान, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप हारणार आहे, असा दावा केला होता. तर योगेंद्र यादव यांच्यासारख्या राजकीय विश्लेषकांनी तर भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही. कदाचित एनडीए देखील बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही, असा दावा सुरुवातीच्या विश्लेषणात केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपची २३० जागांपर्यंत घसरण होईल, तर एनडीएला २७२ चं बहुमतही गाठता येणार नाही. एनडीएतील इतर घटक पक्षांना मिळून ३५ ते ४० जागा मिळतील. तर काँग्रेसला ९० ते १०० जागा मिळतील असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आठवड्याभरानं पुन्हा एकदा त्यांचं नवं विश्लेषण समोर आलं. यामध्ये त्यांनी भाजपला २६० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. तर काँग्रेसला ८५ ते १०० जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला २०५ ते २३५ जागा मिळतील, असा दावा केला होता. इथं एक-दोन एक्झिट पोल सोडले तर सर्व कथित प्रतिष्ठीत एक्झिट पोल्सनं भाजपला सन २०१९ पेक्षा अधिक जागा मिळतील असे आकडे दाखवले. या सर्वांमध्ये केवळ योगेंद्र यादव यांनी केलेलं विश्लेषणचं बरोबर ठरलं आहे. तर एक्झिट पोल्ससारखांच अंदाज मात्र प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता.

Prashant Kishor
Prashant Kishore: '4 जून रोजी भरपूर पाणी सोबत ठेवा'; लोकसभेत भाजपच्या विजयाचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांचा टीकाकारांना सल्ला

प्रशांत किशोर यांनी काय केला होता दावा?

प्रशांत किशोर यांनी आपल्या विश्लेषणात दावा केला होती की, जेव्हा जानेवारी महिन्यात भाजपला ३७० आणि एनडीएला चारशेपार जागा मिळतील. पण मोदींची ही घोषणा केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी आहे, हे शक्यच नाही असं माझं मत आहे. एनडीएला किती जागा मिळतील याचं आकलनं करणं कठीण आहे. पण हे निश्चित आहे भाजपला ३७० जागा मिळणार नाहीत पण ते २७० च्या खाली देखील जाणार नाहीत. उलट गेल्या लोकसभेत भाजपला ज्या ३०३ जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्तच जागा मिळतील.

भाजपला ३०३ पेक्षा जास्तच जागा मिळतील याचं एक साधं गणित आहे. यामध्ये मोदी लाट, हवा हे सर्व बाजूला ठेवलं तर त्यांच्या इतक्या जागा आल्या कशा? ३०३ मध्ये कमीत कमी २५० जागा या उत्तर आणि पश्चिम भारतातून आल्या आहेत. इथं ते जास्तीत जास्त ५० ते ६० जागा हारत आहेत असं चित्र आहे का? दुसरा भाग म्हणजे पूर्व आणि दक्षिण भारत इथं बिहार, बंगाल, उडीसा, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या भागातून भाजपकडं ५० जागा आहेत. या राज्यांमध्ये यंदा भाजपचा वोट शेअर आणि जागाही वाढतील. या जागांमध्ये १५ ते २० जागा वाढतील, असाही दावाही प्रशांत किशोर यांनी केला होता.

Prashant Kishor
Prashant Kishor: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर काय करणार? पीकेंनी मोठ्या 4 बदलांची केली भविष्यवाणी

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात फटका बसणार नाही

किशोर म्हणतात, तर दुसरीकडं योगेंद्र यादव हे म्हणतात की २६८ जागा भाजपला मिळतील हे जरी मानलं तरी त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठं डॅमेज होईल. पण जर महाराष्ट्रात विरोधक २० ते २५ जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपकडं २३ जागा आहेत त्या तशाही कमी होणार नाहीत. तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळून भाजपला २०१४ च्या तुलनेत नुकसान झालं होतं. पण त्या जागा बंगालमधून रिकव्हर झाल्या होत्या. पण जर उत्तर प्रदेशात ८० पैकी भाजपच्या २० जागा कमी होतील असं ते म्हणतं असतील तर त्यात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये तर १८ आधीच हारले होते आणि ६२ जागा त्यांच्याकडं आहेत, मग त्यांना नुकसान कुठं होतंय? पण भाजपला नुकसान तेव्हाच होईल जेव्हा ते ४० ते ५० जागा हारतील. पण ही बाब भाजपही बोलत नाही आणि विरोधकही बोलत नाहीत. पण यंदा या उत्तर आणि पश्चिम भागात भाजपला ५० जागांचा फटका बसेल असं वाटतं नाही. उलट पूर्व आणि दक्षिणेत त्यांच्या २० ते २५ जागा जिंकत आहेत.

तसंच सरकार कधी हारतात तर जेव्हा जनतेच्या मनात मोठी चीड असेल आणि ते म्हणत असतील की हा नेता आम्हाला नको तेव्हा सरकारं बदलतात. पण मोदींविरोधात काहीशी नाराजी असली तरी मोदींविरोधात लाट असल्याचं दोन्ही बाजूचे लोक बोलत नाहीत. जर दुसरा कोणी नवी व्यक्ती आली आणि त्याचा मोठा करिश्मा असेल तर सत्ताबदल होऊ शकतो. त्यामुळं भाजप ३०० वरुन घसरुन २००वर येईल असं मला वाटतं नाही.

Prashant Kishor
Lok Sabha Election 2024: प्रशांत किशोर यांच्या 5 भविष्यवाणी; लोकसभा निकालाच्या किती जवळ जातील?

प्रशांत किशोर यांचं गणित कुठं चुकलं?

प्रशांत किशोर यांनी आपल्या आकड्यांचा दावा केलाच, त्याचबरोबर कुठल्या परिस्थितीत सत्ताबदल होऊ शकतो हे ही सांगितलं. पण याच परिस्थीतीचा अंदाज त्यांना आला नाही. कारण विरोधकांनी या लोकसभा निवडणुकीत विविध मुद्द्यांवर प्रचार केला. यामध्ये सर्वात महत्वाचा ठरलेला प्रचार म्हणजे 'संविधान वाचवा'.

Prashant Kishor
Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ

संविधानाची मोडतोड!

केंद्रातील मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणांचा विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी गैरवापर सुरु केला होता. त्यातच निवडणूक आयोगावर आपलं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावणं, दिल्ली सरकारमधील नियुक्त्यांचा सुप्रीम कोर्टाचा आदेश अध्यादेश काढून फिरवणं, अनेक सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन यातून सरकारी जागा कमी होऊन आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचं चित्र, तसंच भाजपचा ६ वेळचे खासदार राहिलेल्या अनंत हेगडेंसारख्या अनेक वाचाळ नेत्यांनी मोदींना ४०० हून अधिक जागा या संविधान बदलण्यासाठी पाहिजे असं उघड उघड म्हटलं, दुसरीकडं मुस्लिमांविरोधातील द्वेषमुलक विधानं, एक देश-एक निवडणूक याद्वारे संविधानाची फेडरल व्यवस्था बिघडवून राज्याचं महत्व कमी करुन टाकणं, इतकं सर्व संविधानविरोधी घडत असताना आणि विरोधक त्यावरुन आक्रमक प्रचार करत असताना याचा अंडर करंट हा प्रशांत किशोर यांच्या लक्षातच आला नाही. कारण याच मुद्द्यांवरुन देशातील राजकीयदृष्ट्या जागृत दलित वर्ग आणि मुस्लिमांसह ख्रिश्चन, नवबौद्ध या अल्पसंख्यांकांनीही भाजपविरोधात ठाम मत होतं गेलं. हीच खरंतर मोदी सरकारविरोधातील सुप्त लाट होती. पण ही अनेक एक्झिट पोलच्या कंपन्यांच्या आणि खुद्द राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ध्यानातच आली नाही. याचाच फटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणावर बसला.

Prashant Kishor
Vinod Tawde: तावडे ठरले मोदींसाठी तारणहार? INDIA आघाडी आणि पंतप्रधानपद या दोन्हीच्यामध्ये उभा ठाकलाय एक मराठी माणूस

स्थानिक मुद्द्यांकडं डोळेझाक!

तसंच प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रश्नांकडंही प्रशांत किशोर यांनी आपल्या विश्लेषणात साफ दुर्लक्ष केलं, उदा. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा, उद्योग गुजरातला पळवल्याचा मुद्दा अन् पक्ष फोडाफोडीतून निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील भूसंपादन, योगी सरकारची बुलडोझर नीती, मंदिरांच्या कॉरिडॉरसाठी लोकांची उद्ध्वस्त केलेली घरं अन् न झालेलं पुनर्वसन, दलित आणि मुस्लिमांकंड दुर्लक्ष तसंच पेपरलीक प्रकरण यांसारख्या गोष्टींचाही निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो हे प्रशांत किशोर यांनी गांभीर्यानं पाहिलेलं नाही. तसंच एनआरसीचा मुद्दा आणि सीएएची अंमलबजावणी यामुळं पश्चिम बंगालमध्ये 6 जागांचा बसलेला फटका. याकडंही प्रशांत किशोर यांनी विश्लेषण करताना साफ दुर्लक्ष केलंलं दिसलं. दक्षिणेत कुठल्या कारणांसाठी भाजपच्या जागा वाढतील हे देखील त्यांनी विश्लेषणात सांगितलं नाही.

या सर्व कारणांचा प्रशांत किशोर यांना विसर पडल्यानं भाजपला ३०३ पेक्षा कमी जागा येऊच शकत नाहीत हा त्यांचा कॉन्फिडन्स नव्हे तर ओव्हर कॉन्फिडन्स ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com