Raksha Khadse: यंदा हॅट्रिकसह मंत्रीपद मिळवणाऱ्या रक्षा खडसे कोण आहेत? वाचा, एका क्लिकवर

Eknath Khadase: जळगाव जिल्ह्यातील ताल-मुक्ताईनगरच्या सरपंच होत, रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास 2010 मध्ये सुरू झाला.
Raksha Khadse MP Raver
Raksha Khadse MP RaverEsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याबरोबर देशात एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहे.

दरम्यान आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयुष गोयल, प्रताप जाधव, मुरलीधर मोहळ, रामदार आठवले आणि रक्षा खडसे हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची शधी मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोण आहेत रक्षा खडसे?

खासदार रक्षा खडसे रावेरमधून यंदा तिसऱ्यांदा निवडणून आल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी होणाऱ्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते आहेत.

जळगाव जिल्ह्यातील ताल-मुक्ताईनगरच्या सरपंच होत, रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास 2010 मध्ये सुरू झाला. रक्षा यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. एकनाथ खडसे यांचे पुत्र आणि रक्षा यांचे पती निखिल खडसे यांचा २०१३ मध्ये आत्महत्या केली होती.

Raksha Khadse MP Raver
मंत्रिपदासाठी तटकरे-पटेलांमध्ये वाद? दोन नेत्यांच्या भांडणात अडकलं अजित पवार गटाचं मंत्रिपद, नेमकी चर्चा काय?

2014 रक्षा खडसे या रावेर लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 2019 मध्येही रावेरमधून विजय मिळवला. तर, यावेळीही विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली.

यंदाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्याशी होती. यामध्ये रक्षा यांनी श्रीराम पाटील यांचा दोन लाख ७२ हजार १८३ मतफरकाने पराभव केला. रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी रावेर विधानसभा क्षेत्रातून ७० टक्क्यांवर मतांचा टक्का होता.

Raksha Khadse MP Raver
Muralidhar Mohol : पहिल्यांदाच खासदार बनलेल्या पुण्याच्या मोहोळांना मंत्रि‍पदाची लॉटरी

रावेर लोकसभा क्षेत्रात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभेचा समावेश आहे. जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व भुसावळला संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत. चोपड्याला लता सोनवणे (शिंदेगट), रावेरला शिरीष चौधरी (काँग्रेस) मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील (अपक्ष, शिंदे गटाला समर्थन) असे आमदार आहेत. वर्षानुवर्षे भाजपचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात आमदार एकनाथ खडसेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.