नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांच्या कल्लोळात यंदाची लोकसभा निवडणूक खूपच महत्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे या निवडणुकीत दोन जागांवरुन लढत आहेत. पण यंदा प्रियंका गांधी यांनी मात्र निवडणुकीतून माघार घेतली. पण यामागचं कारण काय होतं? हे खुद्द प्रियंका गांधी यांनीच सांगितलं आहे. इंडिया टुडेशी मुलाखतीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. (Why Priyanka Gandhi is not contesting Lok Sabha polls)
प्रियंका गांधी म्हणाल्या, मी रायबरेली लोकसभा मतदारसंघात गेल्या १५ दिवसांपासून काँग्रेसचा प्रचार करत आहे. या मतदारसंघासोबत गांधी परिवाराचं जुनं नातं आहे. इथल्या लोकांना वाटतं होतं की मी इथे येईल त्यांच्याशी चर्चा करेन. आम्ही रिमोट कन्ट्रोलद्वारे इथं निवडणूक जिंकू शकत नाही. कारण जर आम्ही दोन्ही भावंडांनी निवडणूक लढवली असतील तर आम्हाला आमच्या आमच्या मतदारसंघात १५ दिवस ठाण मांडून बसावं लागलं असतं. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की एकानं संपूर्ण देशभरात प्रचार करायचा अन् एकानं निवडणूक लढवायची.
प्रियंका गांधींच्या या उत्तरानंतर भविष्यात त्या लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, मला कधीही वाटतं नव्हतं की मी खासदार व्हावं किंवा निवडणूक लढवावी. मला पक्षासाठी काम करायचं होतं, पक्ष जी जबाबदारी देईन ती मी स्विकारायला तयार होते. जर पक्षातील लोकांना वाटत असेल की मी निवडणूक लढवावी तर मी निवडणूक लढवेन.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली नाही कारण त्यांना पराभवाची भीती वाटतेय. याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा भाजपच्या स्ट्रॅटजी किंवा म्हणण्यानुसार चालत नाही. जर आम्ही दोघे भावंड निवडणूक लढवणार असतो तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. कारण यामुळं काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोणीही उपलब्ध राहिलं नसतं.
त्याचबरोबर राहुल गांधी यांनी आपल्या अमेठी मतदारसंघाऐवजी रायबरेली मतदारसंघ निवडल्यानंही पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ काँग्रेस कधीही सोडणार नाही. या दोन मतदारसंघांचं आणि काँग्रेसचं नातंच वेगळं आहे.
यावर प्रियंका गांधींनी उलट प्रश्न केला की, मोदींनी गुजरातच्या वडेदरातून निवडणूक का लढवली नाही. पंतप्रधान घाबरलेत का? सन २०१४ नंतर त्यांनी वडोदऱ्यातून निवडणूक लढवलेली नाही त्यामुळं ते आता गुजरातमधून पळून गेलेत का? असा सवालही प्रियंका गांधी यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.