Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

या युवा शेतकऱ्यांच्या कृतीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nashik Voting
Nashik Voting
Updated on

नाशिक : राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय. सध्या इथं कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा मतदानावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळंच कांद्यासंबंधीच्या एका घटनेनं इथं मतदान केंद्रावर लक्ष वेधून घेतलं. काही शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला. (with tomato onion garlands at booth nashik youth cast his vote)

Nashik Voting
केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथले युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले. पण त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. "ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी," अशा घोषणाही या तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव इथं मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं.

Nashik Voting
Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

दरम्यान, या प्रकारावर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्यानं मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका" कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढं सत्याग्रह करा, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांना केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.