MVA: शिवसेना - काँग्रेस मध्ये उत्तर मुंबईच्या जागेवरून वादाची शक्यता

Shivsena-Congress: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या आहेत की केवळ बदला घ्यायचा आहे, हे एकदा ठाकरे गटाने ठरवायला पाहिजे,’’ असेही म्हात्रे म्हणाल्या.
Shiv Sena UBT| Congress Loksabha 2024
Shiv Sena UBT| Congress Loksabha 2024Esakal
Updated on

शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामधील सांगलीच्या जागेचा वाद मिटला नसतानाच उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या या दोन घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे, महायुतीत शिंदे गटाकडून नाशिकमध्ये अजित पवार गटाकडून मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध आहे.

ठाकरे गटाच्या वतीने उत्तर मुंबईचे उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या जागेबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्याने ही जागा घोषित करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला असल्याचे समजते.

काँग्रेस पक्ष हा दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत. त्यातच आता उत्तर मुंबईच्या जागेच्या वादाची भर पडण्याची शक्यता आहे.

Shiv Sena UBT| Congress Loksabha 2024
Anandraj Ambedkar : आनंदराज आंबेडकरांनी आणखी निर्णय बदलला; 'वंचित'च्या पाठिंब्यावर...

महाविकास आघाडीतील सांगली आणि उत्तर मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे; मात्र सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. तर उत्तर मुंबईतून अद्याप उमेदवार घोषित झाला नसला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. घोसाळकर यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Shiv Sena UBT| Congress Loksabha 2024
Beed Loksabha election 2024 : बीडमध्ये 'वंचित'चा उमेदवार जाहीर; मग ज्योती मेटेंचं काय? तीन-तीन मराठा उमेदवारांमागे कुणाची खेळी?

केवळ बदला घ्यायचाय का?

काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोप केला आहे. उत्तर मुंबईच्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असताना अशा पद्धतीने थेट प्रचाराला सुरुवात करणे योग्य नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या आहेत की केवळ बदला घ्यायचा आहे, हे एकदा ठाकरे गटाने ठरवायला पाहिजे,’’ असेही म्हात्रे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.