भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती, सुत्रांनी दिलीये. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. तसंच शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास ही चारही महत्वाची खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे.
निवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपने 26 खाती स्वत:कडे ठेवणार आहे. तर सेनेला 13 आणि मित्रपक्षांना 4 खाती देऊ केली आहेत. तसेच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना चर्चेत स्थान दिले तर ते नाकारण्याचा भाजपचा पवित्रा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
भाजपाध्यक्ष अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं आहे. सेना-भाजप वादावरुन शहांचा मुंबई दौरा लांबणीवर पडलाय. आता, वाद संपल्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच भाजपच्या स्थानिक नेतृत्वानंच हा पेच सोडवावा, त्यात केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग असणार नाही, असंही शहांनी सांगितल्याचं सूत्रांचं म्हणण आहे.
फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरुन सध्या युतीचं घोडं अडलंय. एकीकडे शिवसेना समान जागावाटपाबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचं सांगतंय. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री असा कोणत्याही गुप्त वाटाघाटी झाल्याच नाहीत, असा दावा करतायत. त्यामुळे दोघांपैकी एकजण निश्चितपणे खोटे बोलत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. दरम्यान, आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे
Webtitle : bjp offers deputy cm post for shivsena bjp to keep all important ministries
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.