सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 15 वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असणार आहेत. या वेळी 11 हजार 427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यंदा 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली जाणार असून त्यामध्ये मुलींनी मोठे यश मिळवले आहे. तब्बल 43 मुलींना या समारंभात सुवर्णपदके दिली जाणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचाच...खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !
विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात विविध शाखांमधील सहा हजार 92 विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी दिली जाणार आहे. तर 65 जणांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे. यंदा 54 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांना व्यासपीठावरुन पदवी दिली जाईल तर उर्वरित विद्यार्थ्यांना घरपोच अथवा संबंधित विभागात पदवी दिली जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली. या पत्रकार परिषदेस प्रभारी परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा, प्रभारी प्र कुलगुरु डॉ. विकास कदम, उपकुलसचिव डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. रविंद्र चिंचोलकर, डॉ. अभिजित जगताप, डॉ. सुरेश पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचाच... कठीण आहे...कोट्यवधींचा खर्च करुनही कुष्ठरोग निर्मूलन होईना
'या' यशस्वी विद्यार्थींना मिळणार सुवर्णपदके
दिक्षांत समारंभात 65 जणांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे. यंदा 54 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले असून गुणागुक्रमाने प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. यंदा तब्बल 43 मुलींना सुवर्णपदक मिळणार असून 11 मुलांनीही सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामध्ये पल्लवी गायकवाड, सुशमा डांगे, वेन्नेला नामपल्ली, दिव्या पवार, स्वाती पवार, मोनिका वाघ, मीनाबेन पटेल, पायल मोरे, सुचिता भुसे, ऐश्वर्या कोरे, शुभांगी मोरे, पुनम ख्याडगे, सारिका बिराजदार, शाहनीगर शेख, प्रज्ञा वळसंगकर, सायली जोशी, दिव्या कुलकर्णी, मोनिका सावंत, रुपाली नोगजा, गायत्री हगलगुंडे, सृष्टी कसबे, आर्शिया तांबोळी, वैशाली सातपुते, प्रज्ञा कोळेकर, उज्वला शिंदे, मोहसिना सय्यद, जयश्री करुटे, दिपाली ठोकळे, आस्मा यादगिरी, राजश्री कांबळे, सोनाली बचुटे, जसमीन सय्यद, नेहा पुजारी, रुपाली चौगुले, स्वाती तोरवी, राजलक्ष्मी शेट्टीकर या मुलींचा समावेश आहे. |
|