मुख्यमंत्री पदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे लगेचच भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही असणार आहे. दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यादरम्यान आता सत्तावाटपाचा पुढचा प्लॅन ठरण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde Devendra Fadnavis News)
आज संध्याकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतील. या बैठकीमध्ये आता खातेवाटपाविषयीची चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला किती मंत्रीपदे द्यायची आणि कोणती खाती द्यायची, तसंच भाजपाच्या वाट्याला काय येणार याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदेंचं गटनेते पद कायम ठेवणं आणि भरत गोगावलेंना मुख्य प्रतोद पदी नियुक्त करणं, तसंच आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटिसांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.