Beed Startup : इन्फोसिसमधला ऑफीस बॉय ते २ स्टार्ट अप्सचे मालक! पत्राच्या शेडमध्ये सुरू झाली बीडच्या लेकाची यशोगाथा

मेहनत आणि धैर्याने माणूस आपलं नशीब बदलू शकतो.
10 Years Of Canva
10 Years Of Canvaesakal
Updated on

Indian Canva Designer Dadasaheb Bhagat :

मेनत आणि धैर्याने माणूस आपलं नशीब बदलवू शकतं. आज कार्यालयातल्या खुर्च्या लावणारा माणूस उद्या स्वतःची कंपनी उघडू शकतो. महाराष्ट्राचे दादासाहेब भगत यांची कहाणी अशीच आहे. भगत एका ठिकाणी ऑफीस बॉयची नोकरी करायचे. त्यांना महिन्याला १० हजार रुपये पण पगार नव्हता. आज भगत यांनी स्वतःची कंपनी सुरु केली आहे. त्यांच्याकडे परदेशी ऑर्डर्स असतात. त्यांनी इंडियन कॅन्व्हा डिझाइन केले आहे.

स्टार्ट अप, नव्या कंपन्या, नवे शोध हे नेहमीच लहान गोष्टींमधून जन्म घेते. कोणी आपल्या घराच्या गच्चीवर काम सुरु करतो तर कोणी गॅरेजमध्ये. २०२० मध्ये महाराष्ट्रातील बीडच्या एका युवकाने पत्र्याच्या छताखाली कंपनीची सुरुवात केली. त्यांचे नाव दादासाहेब भगत. सामान्य परिवारातले भगत हे इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय होते.

ते आयटीआय डिप्लोमा झालेले असूनही ऑफीस बॉयचा जॉब करत होते. इंडस्ट्रीत नोकरी करण्याऐवजी ते इन्फोसिस गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस देत होते. पाहुण्यांना चहा-पाणी देत होते.

10 Years Of Canva
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले! सख्खे भाऊ केंद्रीय राखीव पोलिस दलात...
10 Years Of Canva
10 Years Of Canvaesakal

अॅनिमेशन अन् डिझाइनचा कोर्स

भगत यांनी इन्फोसिसमध्ये काम करताना सॉफ्टवेअरचे महत्व समजले. ते कॉर्पोरेट वर्ल्डने फार प्रभावित झाले होते. या जगाचा भाग होण्यासाठी कॉलेजची डिग्री हवी हे त्यांना माहित होते. त्यांना अॅनिमेशन आणि डिझाइनमध्येही आवड होती. ते दिवसा नोकरी करायचे आणि संध्याकाळी कोर्स करत. त्यांना मुंबईत या फिल्डमध्ये नोकरी मिळाली. नंतर नोकरी सोडून ते हैद्राबादला गेले.

हैद्राबादला डिझाइन आणि ग्राफीक्सचे काम करताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायलाही सुरुवात केली. भगत यांनी Python आणि C++ शिकलं. याकाळात त्यांना जाणवलं की, व्हिज्युअल इफेक्ट्स बनवण्यासाठी बराच काळ लागतो आणि रियूजेबल टेम्प्लेट्सची लायब्ररी बनवण्याची सुरुवात केली. हळू हळू ते या टेम्प्लेट्सला ऑनलाइन विकू लागले.

10 Years Of Canva
Success Story: ‘दीड जीबी’मुळे वाटोळे नाही तर मी घडलो; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी निहाल कोरे

डिझाइन लायब्ररी बनवली

सगळं व्यवस्थित सुरु असतानाच भगत यांचा कार अपघात झाला. यानंतर त्यांनी नोकरी सोडून संपूर्ण वेळ डिझाइन लायब्ररीला देण्याचा निर्णय घेतला. अंथरुणावर पडल्या पडल्याच स्वप्नाच्या दिशेने पाऊले उचलू लागले.

दोन स्टार्टअप्स सुरु केले

भगत यांनी २०१५ मध्ये आपला पहिला स्टार्टअप Ninthmotion सुरु केला. या कंपनीने संपूर्ण जागातून ६००० क्लाएंट्सना सर्व्हिस दिली. या क्लाएंट्समध्ये BBC Studios आणि 9XM यांचाही समावेश आहे.

कोविड लॉकडाऊनमध्ये त्यांना कंपनी बंद करून बीडला परत जावे लागले.

10 Years Of Canva
Success Story: अंदरसूलच्या ओम खैरनारची गगनभरारी! ISROतील प्रवेशासाठी मानाच्या एरोस्पेस अभियांत्रिकीसाठी निवड
10 Years Of Canva
10 Years Of Canvaesakal

पत्र्याच्या शेडखाली सुरु केली कंपनी

भगत यांनी कॅन्व्हासारखाच ऑनलाइन ग्राफीक डिझाइन प्लॅटफॉर्म सुरु करण्याचं ठरवलं. त्यांनी आपला दुसरा स्टार्टअप DooGraphics सुरु केले. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने यूझर्स टेम्प्लेट्स आणि डिझाइन्स बनवू शकतो.

द बेटर इंडियाला भगत यांनी सांगितलं की, आमच्या शेतात पत्र्याचं शेड असणारा गोठा होता. पहिले आम्ही तिघे जणच काम करत होतो. त्या गोठ्यात आमच्यासाठी जागा केली आणि जनावरांना दुसरीकडे शिफ्ट केले. हळूहळू गावातल्या तरुणांना आवड वाटू लागली आणि शिकण्याची इच्छा जागी झाली.

पत्र्याच्या शेडखाली सुरु झालेल्या कंपनीने ६ महिन्यातच १० हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह यूझर्स झाले. त्यांच्याकडे महाराष्ट्र, दिल्ली, बेंगळूरू बरोबरच जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचेही क्लाएंट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()