१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले...

कर सहाय्यक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा होऊन आता तब्बल १०० दिवस झाले, तरीदेखील निकाल लागलेला नाही. तसेच कौशल्य चाचणीची तारीखही आयोगाने घोषित केलेली नाही. त्यावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र पुढील १५ दिवसांत दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होईल, यादृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
solapur
MPSCe sakal
Updated on

सोलापूर : कर सहाय्यक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा होऊन आता तब्बल १०० दिवस झाले, तरीदेखील निकाल लागलेला नाही. तसेच कौशल्य चाचणीची तारीखही आयोगाने घोषित केलेली नाही. त्यावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र पुढील १५ दिवसांत दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होईल, यादृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील ४६८ कर सहायक आणि सात हजार ३४ लिपिक पदांसाठी लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात आल्या. या भरतीची जाहिरात २० जानेवारी २०२३ ला प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा तीन महिन्यांनी म्हणजेच ३० एप्रिल २०२३ ला तर मुख्य परीक्षा साडेसात महिन्यांनी म्हणजेच १७ डिसेंबर २०२३ मध्ये झाली. पूर्व परीक्षा होऊन एक वर्ष तर मुख्य परीक्षा होऊन चार महिने होत असतानाही अद्याप निकाल जाहीर झालेले नाहीत.

निकालानंतर कौशल्य चाचणी होणार असून त्याचीही तारीख अद्याप निश्चित नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. पण, परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती व त्यावरील निर्णय, दोनवेळा उत्तरतालिका प्रसिद्ध करणे, तज्ज्ञांकडून तपासून घेऊन निकाल जाहीर करणे अशा प्रक्रियांमधून निकाल लागतो. त्यामुळे विलंब झाल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. परंतु, दोन आठवड्यात निकाल प्रसिद्ध होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आयोगाने निकालाचा दिवस जाहीर करावा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा ‘गट-क’चा कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक- २०२३ ही मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला झाली. अद्याप आयोगाकडून निकालाविषयक कोणतेही प्रसिद्धिपत्रक जाहीर झालेले नाही. परीक्षेचा निकाल व कौशल्य चाचणी कधीपर्यंत होईल हे आयोगाने स्पष्ट करावे.

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

राज्यसेवेची संयुक्त परीक्षा कधी?

राज्यसेवेच्या संयुक्त परीक्षेसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केले आणि त्याची परीक्षा देखील जाहीर झाली. पण, राज्य शासनाने मराठा समाजाला दहा टक्के ‘एसईबीसी’ आरक्षण दिले व ते लागू केल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता राज्य शासनाने राज्यसेवेच्या या २६० जागांमध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी किती जागा असतील, यासंदर्भात आयोगाला खुलासा केलेला नाही. 'एसईबीसी' आरक्षणानुसार किती जागा या प्रवर्गासाठी राखीव असतील हे स्पष्ट झाल्यानंतर आयोगाकडून या परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.