१०१९ विद्यार्थी परीक्षेला आलेच नाहीत! सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर परीक्षा सुरळीत; इंग्रजी विषयाचा पहिला पेपर कॉपीमुक्त

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला. इंग्रजीचा पेपर असल्याने जिल्ह्यातील ४६ भरारी पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या. बैठे पथकांनाही सक्त सूचना होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर एकही कॉपी केस आढळली नाही. ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
solapur 12th exam
solapur 12th examsakal
Updated on

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला. इंग्रजीचा पेपर असल्याने जिल्ह्यातील ४६ भरारी पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या. बैठे पथकांनाही सक्त सूचना होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर एकही कॉपी केस आढळली नाही. ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ११८ केंद्रे असून त्यापैकी १६ केंद्रे संवेदनशील आहेत. भरारी पथकांचा सर्वाधिक वॉच याच केंद्रांवर होता. पण, ना संवेदनशील केंद्रांवर ना इतर कोणत्याही केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना सापडला. ८७ दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील एकूण ५७ हजार १८८ विद्यार्थ्यांपैकी ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर सोडविला. मात्र, एक हजार १९ विद्यार्थी वेगवेगळ्या कारणास्तव परीक्षेला आले नाहीत. दरम्यान, परीक्षेसाठी वर्गात जाताना सर्वच परीक्षार्थींची अंगझडती घेण्यात आली. सर्वच केंद्रातील हालचालींवर बैठे पथकांचे लक्ष होते. भरारी पथकांची संख्या मोठी असल्याने कोणीही अचानक येवू शकते या धास्तीने परीक्षेतील गैरप्रकार थांबल्याची स्थिती पहिल्याच दिवशी मंगळवारी पाहायला मिळाली.

यंदा सरमिसळ पद्धत, तरी व्यवस्थित नियोजन

बोर्डाने यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली आहे. एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक वेगवेगळ्या केंद्रांवर आले होते. सुरवातीला विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती होती, पण केंद्रावर आल्यावर त्यांना कोणतीही अडचण आली नाही. पर्यवेक्षक व शाळांच्या मुख्याध्यापकांनी अचूक नियोजन केले होते. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी अनगर (ता. मोहोळ) केंद्राला भेट दिली.

विद्यार्थी अर्धा तास अगोदर केंद्रांवर हजर

पहिलाच पेपर असल्याने जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर सर्वच परीक्षार्थी पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास हजर होते. वर्गात जाण्यापूर्वीच शिक्षकांनी त्यांची अंगझडती घेऊन आत सोडले. पेपरला उशिराने आल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला परत जावे लागले नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी व्यवस्थित नियोजन केल्याने पहिल्या पेपरला सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली.

भरारी अन्‌ बैठे पथकांची धास्ती

महसूल व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ४६ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक भरारी पथकाने मंगळवारी (ता. २१) त्यांच्या त्यांच्या तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. कोणत्याही परीक्षा केंद्रावर त्यांना अनुचित प्रकार आढळला नाही.

----------------------------------------------------

पहिल्या दिवशी एकही कॉपी केस नाही

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर मंगळवारी सुरळीत परीक्षा पार पडली. ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी उपस्थिती होती. पहिल्या इंग्रजीच्या पेपरला एकही कॉपी केस आढळली नाही.

- मारुती फडके, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.