सोलापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीचे २८ हजार ९७६ आणि बारावीतील ५६ हजार ८४५ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आठ केंद्रे असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी व बैठे पथके देखील नेमली जाणार आहेत.
बोर्डाची परीक्षा पार पडल्यानंतर मे महिन्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ३० जुलैला तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेसाठी २९१ केंद्रे तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २७९ केंद्रांवर होणार आहे. पुणे विभागातील इयत्ता दहावीतील पाच हजार ८१७ तर बारावीतील दहा हजार ५५९ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३३ तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४६ परीक्षा केंद्रे असणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आठ परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील इयत्ता अकरावीसाठी प्रवेश (रिक्त जागा असल्यास) घेण्याची संधी मिळणार आहे.
नवीन धोरणानुसार बोर्ड परीक्षांचा पॅटर्न बदलणार
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये बदल होणार आहेत. दहावीची परीक्षा शाळा स्तरावरच होईल. तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दोन सत्रात (वर्षातून दोनदा) घेण्याचे नियोजित आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि उन्हाळा सुट्यांपूर्वी दुसरे सत्र, अशी परीक्षेची रचना असणार आहे. सुरवातीला ‘सीबीएसई’ बोर्डाकडून त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तो पॅटर्न स्वीकारणार आहे. पण, तूर्तास बोर्डाची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होतील.
पुरवणी परीक्षेची स्थिती
दहावीचे विद्यार्थी
२८,९७६
परीक्षा केंद्रे
२९१
बारावीचे विद्यार्थी
५६,८४५
परीक्षा केंद्रे
२७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.