Water Crisis : राज्यात ११ हजार गावे टँकरवर अवलंबून; राज्यातील धरणांत २१ टक्के जलसाठा

मराठवाड्यात मॉन्सून लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
11 thousand villages depend on tankers in the state 21 percent water storage in dams
11 thousand villages depend on tankers in the state 21 percent water storage in damsSakal
Updated on

मुंबई : कोकणात मॉन्सूनची चाहूल लागली असली तरी राज्यात मात्र दुष्काळाने हजारो गावांच्या घशाला कोरड पडली आहे. राज्यात जवळपास ११ हजार ३३१ गावे आणि वाड्या पाण्यासाठी गावात येणाऱ्या टॅंकरवर अवलंबून आहेत. राज्यातील सर्व धरणातील जलसाठ्यानेही तळ गाठला असून राज्यात केवळ २१.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

विशेष म्हणजे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ८.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात मॉन्सून लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत आज दुष्काळाचा आढावा घेत दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

धरणांचा जलसाठा

नागपूर - ३७.८५

अमरावती - ३८.११

छत्रपती संभाजीनगर - ८.५७

नाशिक - २३.५९

पुणे - १४.९०

कोकण - ३२.१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.