भीमा नदीत वीर, उजनी धरणातून 1.10 लाख क्युसेकचा विसर्ग! नदी काठावरील 105 गावांना सतर्कतेचा इशारा; पूर टाळण्याचा प्रयत्न; मदतीसाठी ‘हा’ क्रमांक लक्षात ठेवा

रविवारी उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमेत ५० हजारांपर्यंत क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. वीरमधून ५० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूरपासून पुढे पूरस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ujani dam
ujani damsakal
Updated on

सोलापूर : उजनी धरण १०० टक्के भरले असून आता धरणातून भीमा नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमेत २० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. आता तो वाढवून ५० हजारांपर्यंत करण्यात आला आहे. वीरमधूननही ५० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूरपासून पुढे पूरस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण पुण्यातील पावसामुळे १०० टक्के भरले आहे. धरणात १०० टक्के पाणी ठेवून वरून येणारा विसर्ग आहे तसाच भीमा नदीतून खाली सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात दौंडवरून ९५ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. धरणात ११७.२८ टीएमसी पाणी मावते, त्यात ५३.५७ टीएमसी उपयुक्त तर ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे. पावसाळा अजून दोन महिने शिल्लक असल्याने आता धरणात १०७ टीएमसीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून दिले जाणार आहे. दुसरीकडे वीर धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर येवू शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीपासूनच नदी काठच्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

नदीत १.२० लाख क्युसेक विसर्ग ठेवण्याचा प्रयत्न

वीर धरणातून ५० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला असून आता उजनी धरणातून सोडलेला विसर्ग देखील ५० हजारांपर्यंत केला जाणार आहे. पंढरपूर परिसरातील भीमा नदीच्या पात्रात एक लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. पण, त्याहून जास्त विसर्ग वाढल्यास भीमा नदी काठावरील १०५ गावांना धोका होवू शकतो. त्या सर्वांनाच ग्रामसुरक्षा समित्यांच्या माध्यमातून सकर्त राहण्याचा इशारा दिला आहे.

पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी ‘हा’ क्रमांक

१८००२७०३६०० ग्रामसुरक्षा समिती यंत्रणेचा क्रमांक आहे. पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, तहसीलदार यांच्याशी सपंर्क साधता येईल. गरजेच्यावेळी सातारा, पुणे या जिल्ह्यातून ‘एनडीआरएफ’चे पथक बोलविण्याचीही तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. २०२० नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली नाही, पण संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.