Police Transfers :राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या एका क्लिकवर!

IPS Transfers News: पुण्यातील परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.
Police Transfers :राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या एका क्लिकवर!
Updated on

Latest Maharashtra News : भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) पोलिस उपायुक्त दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून बुधवारी (ता. ७) काढण्यात आले.

गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर, पुण्यातील परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.

Police Transfers :राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या एका क्लिकवर!
Police Officer Transfers : राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

अन्य पोलिस अधिकाऱ्यांचे नाव, सध्याचे आणि कंसात बदलीचे ठिकाण-

विनयकुमार राठोड- पोलिस उपायुक्त वाहतूक, ठाणे शहर (पोलिस अधीक्षक ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर), अविनाश बारगळ- पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (पोलिस अधीक्षक बीड), अविनाश कुमार- अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नांदेड (पोलिस अधीक्षक नांदेड), दिगंबर प्रधान- पोलिस अधीक्षक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पोलिस उपायुक्त मुंबई), मोहन दहीकर- पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे (पोलिस उपायुक्त ठाणे शहर), प्रकाश जाधव- पोलिस उपायुक्त, मुंबई (सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, मुंबई),

Police Transfers :राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या एका क्लिकवर!
Police Inspector Transfer : पुण्यातील २० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आदेश

गोरख भामरे- पोलिस उपायुक्त नागपूर (पोलिस अधीक्षक गोंदिया), जी. श्रीधर- पोलिस अधीक्षक, हिंगोली (पोलिस उपायुक्त पुणे), प्रियांका नारनवरे- समादेशक राज्य राखीव पोलिस बल, नागपूर (पोलिस अधीक्षक लोहमार्ग नागपूर). तसेच, भारतीय पोलिस सेवेतील मनीष कलवानिया, श्रीकृष्ण कोकाटे आणि नंदकुमार ठाकूर यांची बदली करण्यात येत असून, त्यांच्या पद स्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.