SSC HSC Result Date 2023: बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, दहावीचा निकाल १० जूनपूर्वी; ‘डी.एड’ २०२८ पर्यंत सुरुच राहणार

दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.
SSC HSC Result Date 2023
SSC HSC Result Date 2023sakal
Updated on

SSC HSC Result Date 2023 : दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.

SSC HSC Result Date 2023
Government Job : SSC परीक्षा द्या आणि केंद्र सरकारी नोकरी मिळवा

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.

सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

मेअखेरीस निकाल जाहीर न झाल्यास ३ ते ४ जूनपर्यंत तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.

SSC HSC Result Date 2023
HSC Exam 2023 : मुलाच्या परीक्षेसाठी वडीलाचा अंतविधी थांबविला

निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत बोर्डाने आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु केल्याचेही सांगण्यात आले.

‘डी.एड’ कॉलेज पाच वर्षे सुरुच राहणार

राज्यात ‘डी.एड’चे ५९५ महाविद्यालये असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘डी.एड’चा उल्लेख नसल्याने संभ्रमावस्था आहे. तरीपण, राज्यातील ‘डी.एड’ कॉलेज २०२८ पर्यंत सुरुच राहणार आहेत.

परंतु, त्यांना नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘बी.एड’मध्ये रुपांतर करावे लागणार आहे. राष्ट्रीय अध्यापक परिषदेकडे (एनसीटीई) तसे प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत.

तुर्तास पुढील पाच वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना ‘डी.एड’साठी प्रवेश घेता येणार असून संबंधित महाविद्यालयांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (एससीईआरटी) तशी नोंदणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.