बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार

एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
HSC Science Students likely to lost 10 marks | HSC News
HSC Science Students likely to lost 10 marks | HSC Newsसकाळ डिजिटल टीम
Updated on

राज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी अनन्यसाधारण असते. विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी वर्षभर मेहनत घेतात. या परीक्षेत मिळणारे एकूण एक गुण खुप महत्त्वाचा असतो. अशात बारावीच्या विद्यार्थ्यासाठी धक्कादायक बातमी आहे. एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्याच आल्याचे बोलले जात आहे. गुणांबाबतचा निर्णय आता नियामकाना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे.

HSC Science Students likely to lost 10 marks | HSC News
‘हिजाब’ला संवेदनशील रुप नको

जीवशास्त्राच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नात 10 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना केवळ पर्याय लिहिला असल्यास अथवा फक्त उत्तर असल्यास शून्य गुण देण्याच्या सूचना परीक्षक आणि नियामकांना देण्यात आल्या आहेत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय लिहिल्यास तरच गुण मिळणार आहे.

HSC Science Students likely to lost 10 marks | HSC News
CM उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकर पुन्हा EDच्या रडारवर

दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर विद्यार्थी या वर्षी ऑफलाईन परीक्षा देत आहे. अशातच या निर्णयाने पेपर तपासणी कठोर दिसत आहे. यावरुन आता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.