HSC Exam Update: पावसामुळे आज 12 वीची परीक्षा चुकली? नो टेंशन, पुन्हा परीक्षा देता येणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं जाहीर

विद्यार्थी उशीरा पोहोचले तरी त्यांना परीक्षेला बसता येणार आहे. यशिवाय आज ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल
12th exam
12th exam
Updated on

मुंबई- राज्यातल्या अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशात १२ वीची आज परीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी उशीरा पोहोचले तरी त्यांना परीक्षेला बसता येणार आहे. यशिवाय आज ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असं केसरकरांनी जाहीर केलंय.

रायगड, ठाणे, पुण्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईच्या शाळेबाबत पालिका आयुक्त निर्णय घेत असतात. पाणी जास्त साचलं तरी तसा निर्णय घेतला जाईल, असं केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

12th exam
Pune Rains: पुण्यात पावसाचा धुमाकूळ! कालपासून शहरात काय काय घडले? आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या 3 महत्त्वाच्या सूचना

काही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने पावसामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेकांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण येत होती. अनेकजण उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची शक्यता होती. याची दखल शिक्षण मंत्र्यांकडून घेण्यात आली आहे. त्यांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा केंद्रात बसू देण्याची सवलत दिली आहे. तसेच जे परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांना एक संधी दिली जाईल.

पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात कंबरे इतके पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसराला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. बोटी घेऊन एनडीआरएफची टीम नागरिकांना वाचवण्याचे काम करत आहे. सोसायटी आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला होता. आज जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी ऑफिसला देखील सुट्टी जाहीर केली आहे

12th exam
Pune Rain News : ताम्हिणीत महाविक्रमी ५५६ मिमी पाऊस, आदरवाडी येथे दरड कोसळुन ताम्हिणी-कोलाड रस्‍ता बंद, एकाचा मृत्‍यु

पुण्यात विक्रमी पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. डेक्कन जिमखाना येथे टपरी हलवताना विजेचा करंट लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com