Corona News: राज्यात आढळले कोरोनाचे तब्बल इतके रुग्ण; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Updated on

राज्यात बुधवारी १३८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,७३,१४९ झाली आहे. तर राज्यात आज एकूण ८३२ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच बुधवारी ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ८०,२३,७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे.

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Solapur Corona Update : सोलापुरात कोरोनाने रुग्णाचा मृत्यू; देगाव परिसरात आढळला एक कोरोना बाधित रुग्ण

दरम्यान राज्यात एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७६,६४,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७३,१४९ (९.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात बुधवारी १४,०७७ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी २१७३ आरटीपीसीआर चाचणी, तर ११,९०६ आरएटी चाचणीची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे. आजची पॉझिटिव्हीटी १.० टक्के एवढी आहे.

गृह विलीगीकरणात असलेले रुग्ण : ७६५ (९५.९टक्के)

रुग्णालयात दाखल असलेले रुग्णः ३४ (४.३ टक्के)

आयसीयूमध्ये नसलेले रुग्णः २५ (३.१ टक्के)

आयसीयूमध्ये असलेले रुग्णः ९ (१.१टक्के

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Corona Update: राज्यात आज शंभरच्यावर कोरोना रुग्णांची नोंद; तर रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर

जेएन.१ व्हेरिंएंटचे ३२ रुग्ण  :

राज्यात बुधवारी जेएन.१ व्हेरिएंटच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नसून जेएन.१ व्हेरिएंटचे एकूण ३२ रुग्ण आहेत. पुणे जिल्हा १७, ठाणे ५, बीड ३, छ. संभाजीनगर २, कोल्हापूर, अकोला, सिंधुदूर्ग, सातारा  आणि नाशिक अनुक्रमे १ असे एकूण ३२ रुग्ण आहेत.

मुंबईत २० रुग्णांची नोंद :

मुंबईत बुधवारी २० पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याने आता मुंबईत एकूण ११६४२४६ एवढे रुग्ण झाले आहेत. तर १३८ रुग्ण सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. तसेच दिवसभरात चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर १९ जणांना घरी सोडण्यात आले. मुंबईत दिवसभरात ५१२ चाचण्या करण्यात आल्या असून आता १ डिसेंबर पासून आता पर्यंत ५,७८२ इतक्या चाण्या करण्यात आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यात बुधवारी जेएन.१ व्हेरिएंटच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नसून जेएन.१ व्हेरिएंटचे एकूण ३२ रुग्ण आहेत. पुणे जिल्हा १७, ठाणे ५, बीड ३, छ. संभाजीनगर २, कोल्हापूर, अकोला, सिंधुदूर्ग, सातारा  आणि नाशिक अनुक्रमे १ असे एकूण ३२ रुग्ण आहेत.

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Nashik Cororna Update : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या पन्नासहून अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.