अबब..! 8 महिन्यांत सोलापूरकरांची 15 कोटींची ‘सायबर’ फसवणूक; ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सांगितला ‘हा’ सोपा उपाय; नक्की वाचा, कधीच होणार नाही फसवणूक

सोलापूर शहरातील साडेबाराशे जणांना सायबर गुन्हेगारांनी फेडेक्स कुरिअरमध्ये ड्रग सापडले, शेअर ट्रेडिंग ३०० टक्क्यांपर्यंत परतावा, ऑनलाइन रिव्ह्यू टास्क गेममध्ये चांगला परतावा, अशा आमिषातून १४ कोटी ६८ लाख ३५ हजार ८८ रुपयाला गंडा घातला आहे.
solapur city
CP M. rajkumaresakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील साडेबाराशे जणांना सायबर गुन्हेगारांनी फेडेक्स कुरिअरमध्ये ड्रग सापडले, शेअर ट्रेडिंग ३०० टक्क्यांपर्यंत परतावा, ऑनलाइन रिव्ह्यू टास्क गेममध्ये चांगला परतावा, अशा आमिषातून १४ कोटी ६८ लाख ३५ हजार ८८ रुपयाला गंडा घातला आहे. याची नोंद सायबर पोलिसांत झाली असून त्यापैकी सायबर पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रक्कम बॅंकांमध्येच गोठवली असून दोन कोटी सात लाख ८१ हजार रुपयांची रक्कम संबंधितांना परत दिली आहे.

सोलापूर शहरात कमी दिवसांत दामदुप्पट रक्कम किंवा बॅंकांच्या तुलनेत पाचपट- दहापट व्याजदर, अशा आमिषातून अनेकांची फसवणूक झाली आहे. याशिवाय आता फेडेक्स कुरिअर पार्सलमध्ये ड्रग सापडल्याचे सांगून ऑनलाइन रिव्ह्यू टास्क आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला ३०० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखविले जात आहे. कमी वेळेत घरबसल्या जादा पैसे मिळतील, या सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून अवघ्या आठ महिन्यांत सोलापूर शहरातील १२५० जणांनी १४ कोटी ६९ लाख रुपयांची स्वत:चीच फसवणूक करून घेतली आहे.

परदेशात पाठविण्यात येत असलेल्या तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे. आता तुम्हाला अटक करावी लागेल, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत हजर राहावे लागेल, असे सांगून सायबर गुन्हेगार धमकी देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यावेळी समोरील व्यक्तीला ईडी, सीबीआयची देखील धमकी दिली जात असल्याची स्थिती आहे. अनेकजण सायबर गुन्हेगारांच्या धमकीला, जादा परताव्याला बळी पडून फसत आहेत.

सोलापूर शहरातील सायबर गुन्हे

१) फेडेक्स कुरिअर पार्सल ड्रगचे गुन्हे

  • फसवणूक झालेली रक्कम

  • ३,००,४०,५१० रुपये

  • परत मिळालेली रक्कम

  • १२,२०,२६५ रुपये

  • बॅंकेत गोठवलेली रक्कम

  • ८०,०५,२०० रुपये

----------

२) शेअर ट्रेडिंग गुन्हे

  • फसवणूक झालेली रक्कम

  • ५,६५,८०,९०८ रुपये

  • परत मिळालेली रक्कम

  • १,०१०,६५० रुपये

  • बॅंकेत गोठवलेली रक्कम

  • ५०,८०,७५० रुपये

-----------------------------------------

३) ऑनलाइन रिव्ह्यू टास्क

  • फसवणूक झालेली रक्कम

  • ५,६२,५३,६७० रुपये

  • परत मिळालेली रक्कम

  • ९५.५० लाख रुपये

  • बॅंकेत गोठवलेली रक्कम

  • २४,०२,६४० रुपये

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी...

  • अनोळखी व्यक्तीचे व्हॉट्सॲप व मोबाईल कॉल घेणे टाळा, त्यांना उत्तर देऊ नका

  • सायबर गुन्हेगारांच्या कोणत्याही धमकीला, दबावाला व आमिषाला बळी पडू नका, थेट पोलिसांत तक्रार करा

  • मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, स्वत:ची माहिती शेअर करू नका

  • व्हिडिओ प्रसारित करण्याची भीती दाखवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी न घाबरता पोलिसांना माहिती

  • द्या

  • व्हिडिओ कॉल करून हिप्नोटाईज करून जाळ्यात उडवण्याची शक्यता असते, त्याला बळी पडू नका

फसवणूक झाल्यावर काय करायचे...

  • कुटुंबीयांना व पोलिसांना तत्काळ माहिती द्या

  • पोलिस अधिकारी किंवा संगणकतज्ज्ञांशी संपर्क साधून उपाय विचारा

  • तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवा

  • सायबर चोरट्यांनी खात्यातील रक्कम लंपास केल्यास २४ तासांत पोलिसांत जा, रक्कम गोठविण्यास मदत होते

अनोळखी क्रमांकावरून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कॉल आल्यास...

समोरील अनोळखी व्यक्ती मी पोलिस आहे, ईडी, सीबीआयमधून बोलतोय म्हणून कोणी बोलून धमकी देत असेल तर त्या व्यक्तीला स्वत:ची माहिती देवू नये. त्याला सांगावे तुम्ही घरी येऊन माहिती घ्या किंवा आम्ही जवळील पोलिस ठाण्यात जातो. एवढी खबरदारी घेतली तरी कोणाची फसवणूक होणार नाही.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सायबर हेल्पलाइन : १९३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.