मंत्री दानवेंनी शब्द पाळला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर 156 फेऱ्या, प्रथमच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsava) मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे.
Central Railway Raosaheb Danve
Central Railway Raosaheb Danveesakal
Updated on
Summary

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

रत्नागिरी : नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील (Ganpati Festival) आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्यरेल्वेने (Central Railway) यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

यानुसार २०२३ मधील गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. या आधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता.

Central Railway Raosaheb Danve
NCP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; आरोपीनं कारागृहातून 22 कॉल करत हलवली खुनाची सूत्रं, चायना मोबाईलचा वापर

त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या; मात्र येत्या सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे.

Central Railway Raosaheb Danve
VIDEO : अंधश्रद्धेमुळं अनेक वर्षे बंद होता CM कार्यालयाचा दरवाजा, मुख्यमंत्र्यांनी 'ती' शंका दूर केली अन्..

मेमू स्पेशल गाडीसह कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहयोगाने गणेशोत्सवासाठी गणपती विशेष गाड्यांच्या १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार रेल्वेने गणेशोत्सवातील या आधीच्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यंदा प्रथमच दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे.

Central Railway Raosaheb Danve
Monsoon Update : शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी घाई करू नका; कृषी विभागाची पेरणीबाबत महत्वाची अपडेट

सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण १२ डबे जोडले जाणार आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()