सात महिन्यांत खरेदी-विक्रीचे १५.८० लाख व्यवहार! सरकारच्या तिजोरीत ३१,३२१ कोटी जमा; आता ‘या’ दस्तऐवजासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्पचे बंधन

राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर या काळात ५५ हजार कोटींच्या उद्दिष्टातील ५७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सात महिन्यांत १५ लाख ८० हजार ६७१ खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून या विभागाला ३१ हजार ३२१ कोटींचा महसूल मिळाला आहे.
mantralay
mantralaysakal
Updated on

सोलापूर : राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर या काळात ५५ हजार कोटींच्या उद्दिष्टातील ५७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सात महिन्यांत १५ लाख ८० हजार ६७१ खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून या विभागाला ३१ हजार ३२१ कोटींचा महसूल मिळाला आहे. दरमहा या विभागाकडून सरकारच्या तिजोरीत साडेचार हजार कोटी रुपये जमा होत आहेत.

मुद्रांक शुल्क विभागाकडील व्यवहारातून राज्य सरकारच्या तिजोरीत दरमहा साडेचार ते पाच हजार कोटींचा महसूल जमा होतो. राज्य सरकारच्या तिजोरीत दरवर्षी जमा होणाऱ्या पाच लाख कोटींच्या महसुलात मुद्रांक शुल्क विभागाचे ५५ हजार कोटी रुपये असतात. आता शासनाने वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्र करण्यासाठी १०० रुपयांचे स्टॅम्पऐवजी ५०० रुपयांच्या स्टॅम्पचे बंधन घातले आहे. त्यामुळे दरवर्षी अंदाजे पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा महसूल वाढण्याची शक्यता आहे.

शासनाकडून विविध योजनांवर कोट्यवधींचा खर्च होत असताना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत अद्याप निर्माण झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ५०० रुपयांचे स्टॅम्प वापरण्याच्या निर्णयामुळे दरवर्षी मुद्रांक शुल्क विभागाकडून पाच हजार कोटी ज्यादा मिळणार आहेत. सात महिन्यांत या विभागाने ५५ हजार कोटींच्या उद्दिष्टातील ५७ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. आता नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांत उद्दिष्टातील उर्वरित २३ हजार ६७९ कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा मुद्रांक शुल्क विभागाला आहे.

आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पचे बंधन

सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपवरुन दस्तावेज तयार करता येत होता. १००, २०० किंवा ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जायचा. मात्र, यापुढे आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र करावे लागणार आहे. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता १००, २०० रुपयांऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प) मोजावे लागणार आहे.

  • खरेदी-विक्रीतील महसुलाची स्थिती

  • एकूण उद्दिष्ट

  • ५५,००० कोटी

  • सात महिन्यातील व्यवहार

  • १५,८०,६७१

  • तिजोरीत जमा महसूल

  • ३१,३२०.६२ कोटी

  • दरमहा सरासरी व्यवहार

  • २.५० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.