latest Paithan News: येथील जायकवाडी धरणात वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन धरण प्रशासनाने १२ दरवाजे उघडल्यानंतर पुन्हा ६ दरवाजे उघडल्याने आता धरणातुन एकुण १८ दरवाज्याद्वारे गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.या १८ दरवाजातुन ६ हजार २८८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजाची एकुण संख्या २८ आहे.
एकुण ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा हा विसर्ग असुन गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिला आहे.
दरम्यान, यंदा मृत पाणी साठ्यात गेलेले जायकवाडी धरण शंभर टक्के भरुन वाहिल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.यामुळे पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक व जनावरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.याबद्दल शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला आहे.