राज्यातील सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांना डिसेंबर महिन्याचे अद्याप मानधन नाही

राज्यात एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेंतर्गत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका काम करीत आहेत.
Anganwadi sevika
Anganwadi sevikasakal
Updated on
Summary

राज्यात एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेंतर्गत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका काम करीत आहेत.

पुणे - जानेवारी महिना (January Month) संपत आला तरी अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Workers) मागील डिसेंबर (December) महिन्याचे मानधन (Honorarium) अद्याप मिळालेले नाही. तसेच, आशा स्वयंसेविकांनाही ऑक्टोबरपासूनचा कामाचा मोबदला दिलेला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मानधन वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत राज्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांना कुटुंबाची उपजीविका भागविणे अवघड झाले आहे.

राज्यात एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेंतर्गत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. या सर्व महिला गरीब कुटुंबापैकी आहेत. मानधनाची रक्कम ही बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचा आधार आहे. मानधन वेळेवर मिळाले नाही, तर त्यांची आणि कुटुंबाची उपासमार सुरवात होते. या परिस्थितीत अंगणवाडी सेविकांना उपाशीपोटी योजनेचे काम व्यवस्थित करता येत नाही. त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होत आहे.

Anganwadi sevika
सरकारच्या वाईन निर्णयावर प्रसाद लाड म्हणाले,मदिरालये सुरू केली....

‘आशां’च्या मानधनात वाढ, परंतु ती कागदावरच

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांवर कोरोना कालावधीत माहिती व अहवाल अचूक संकलनाचे कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात १ जुलै २०२१ पासून गटप्रवर्तकांच्या मानधनात १२०० रुपये आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली. परंतु ही वाढ गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना अद्याप देण्यात आलेली नाही. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ थकबाकीसह देण्यात यावी. तसेच, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य सरकारच्या निधीतून देण्यास मान्यता दिली आहे, परंतु ही रक्कमही मिळालेली नाही.

गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांच्या इतर मागण्या

  • गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.

  • राज्य सरकारकडून कोविड लसीकरणासाठी मंजूर प्रतिदिन दोनशे रुपये थकबाकीसह देण्यात यावेत.

  • केंद्र सरकारमार्फत गटप्रवर्तकांना दरमहा पाचशे रुपये आणि आशा स्वयंसेविकांना एक हजार रुपये थकीत रक्कम द्यावी.

  • जिल्हा परिषद फंडातून दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये द्यावेत

  • ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कामाचा पूर्ण मोबदला देण्यात यावा.

  • स्टेशनरी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

राज्यातील दोन लाख महिला कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे राज्यात दोन लाख कुटुंब उपाशी दिवस काढत आहेत. त्यांना तातडीने मानधन देऊन कुटुंबाची उपासमार थांबवावी. तसेच, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामाचा मोबदला तातडीने द्यावा.

- नीलेश दातखिळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.