मोफत उच्चशिक्षणाची 20 लाख मुलींना प्रतीक्षा! शासनाकडून निर्णय नाहीच; महाविद्यालये म्हणतात, निर्णय कागदावर नसल्याने संपूर्ण फी द्यावी लागेल; यंदा आहे ‘एवढी’ फी

राज्यातील उच्च शिक्षणाच्या ६४२ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. या निर्णयाचा अंदाजे २० लाख मुलींना फायदा होणार असून सरकार त्यासाठी दरवर्षी १८०० कोटी रूपये भरेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : राज्यातील उच्च शिक्षणाच्या ६४२ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना (उत्पन्न मर्यादा आठ लाखांपर्यंत) मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. या निर्णयाचा अंदाजे २० लाख मुलींना फायदा होणार असून सरकार त्यासाठी दरवर्षी १८०० कोटी रूपये भरेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, आता प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाही त्यासंदर्भातील निर्णय कागदावर आला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी संपूर्ण फी भरावीच लागेल, अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाख ५३ हजारांपर्यंत असून त्यात ६२ हजारांपर्यंत मुली असतात. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ४३ हजारांपर्यंत असून त्याठिकाणी देखील गतवर्षी १४ हजारांपर्यंत मुलींनी प्रवेश घेतला होता. दुसरीकडे कृषी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २२ हजारांपर्यंत असून तेथेही आठ ते नऊ हजार मुलींचे प्रवेश होतात. याशिवाय बीए, बीकॉम, एससी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध उच्च शिक्षणातील ६४० कोर्सेससाठी देखील मुलींची संख्या २२ लाखांपर्यंत आहे.

मोफत शिक्षणाच्या निर्णयाचा राज्यातील २० लाख मुलींना लाभ होईल, असे शासनाकडूनच सांगण्यात आले आहे. आता एवढ्या मुलींना शासनाच्या निर्णयाअभावी आता महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क स्वत:हून भरावे लागणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दरवर्षी झालेल्या खर्चाचा अंदाज घेऊन प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क राज्याच्या शुल्क निश्चिती समितीकडून वार्षिक शुल्क ठरते. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचेही वार्षिक शुल्क असेच ठरते.

शैक्षणिक शुल्कासाठी पालकांवर उसनवारीची वेळ

अभियांत्रिकीसह अन्य महाविद्यालयांची दरवर्षीची ट्युशन व डेव्हलपमेंट अशी एकत्रित फी शुल्क समितीकडून निश्चित होते. शासकीय कोट्यातून प्रवेश मिळालेल्यांची ५० टक्के ट्युशन फी शासन भरते. उर्वरित संपूर्ण फी विद्यार्थ्याला भरावीच लागते. बहुतेक महाविद्यालये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून एकरकमी शुल्क घेतात तर काही महाविद्यालये सुरवातीला ५० टक्के शुल्क घेतात. पण, मुलींना उच्च शिक्षण मोफतचा निर्णय अद्याप कागदावर आला नसल्याने पालक चिंतेत आहेत.

उच्च शिक्षणाचे शैक्षणिक शुल्क

  • ‘अभियांत्रिकी’चे वार्षिक शुल्क

  • ९०,००० ते १.४० लाख

  • ‘फार्मसी’चे वार्षिक शुल्क

  • ८५,००० ते १.४५ लाख

  • ‘कृषी’चे वार्षिक शुल्क

  • ७५,००० ते १.२० लाख

  • मोफत होणारे कोर्सेस

  • ६४२

  • मोफत शिक्षणासाठी पात्र मुली

  • २० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.