सोलापूर जिल्ह्यात 20 लाख वाहने! दरवर्षी वाढताहेत 65 हजार वाहने; पुणे-मुंबईसारखी वाहतूक कोंडीची स्थिती निश्चित येईल, पण थोड्या वर्षांनंतर, कोणती वाहने किती? वाचा...

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६५ हजार वाहनांची भर पडत आहे. दहा वर्षांपूवी सात लाखांपर्यंत असलेल्या वाहनांची संख्या ऑक्टोबर २०२४ अखेर २० लाखांपर्यंत पोचली आहे. त्यात सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत १३ लाख तर अकलूज आरटीओअंतर्गत पाच लाखांपर्यंत वाहने आहेत.
traffic jam solapur city
traffic jam solapur citysakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील वाहन विक्रीने उच्चांक गाठला आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६५ हजार वाहनांची भर पडत आहे. दहा वर्षांपूवी सात लाखांपर्यंत असलेल्या वाहनांची संख्या ऑक्टोबर २०२४ अखेर २० लाखांपर्यंत पोचली आहे. त्यात सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत १३ लाख तर अकलूज आरटीओअंतर्गत पाच लाखांपर्यंत वाहने आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून सध्या सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-सांगली, सोलापूर-पुणे, हत्तुर बायपास असे महामार्ग झाले आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बहुतेक गावांमध्ये व वस्त्यांनाही पक्क्या रस्त्याने जोडले गेले आहे. परंपरागत पद्धतीने शेती करणारे शेतकरी आता नगदी व फळबागांच्या शेतीकडे वळल्याने त्यांच्याही हाती चांगला पैसा येत आहे.

उच्चशिक्षित व नोकरी, स्वयंरोजगार करणाऱ्या तरुणांचेही प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण, वाहन चालविण्याचे पुरेपूर ज्ञान नसताना पालक मुलांच्या हाती वाहन देत असल्याचीही स्थिती आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी कशी चालवायची, याचीही माहिती अनेकांना नाही. रस्त्यांवरील खड्डे, दुभाजक तोडून शॉर्टकट पर्याय, मद्यपान, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व माल वाहतूक, लेन कटिंग, अतिवेग, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर नाही, अशा कारणांमुळे रस्ते अपघात वाढले आहेत. दुसरीकडे शहराच्या रस्त्यांवरील वाहने वाढल्याने प्रवासाचा कालावधी देखील वाढू लागल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.

दहा वर्षात सोलापुरात वाहनांची वाढ

  • सन एकूण वाहने

  • २०१४ ६,०९,७१२

  • २०१५ ६,६८,८८८

  • २०१६ ७,२७,०७७

  • २०१७ ७,९२,१२५

  • २०१८ ८,८६,५६८

  • २०१९ ९,२६,८३९

  • २०२० ९,८८,०४६

  • २०२१ १०,५९,२४४

  • २०२२ १०,०४,७७०

  • २०२३ ११,६६,९१४

  • २०२४ १२,७०,०१६

जिल्ह्यात १३.६३ लाख दुचाकी

जिल्ह्यातील सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सद्य:स्थितीत ३ लाख वाहने असल्याची नोंद आहे. त्यात दहा लाख २४ हजार दुचाकी आहेत. दुसरीकडे अकलूज आरटीओ कार्यालयाकडे पाच लाख वाहनांची नोंद असून त्यात तीन लाख ३९ हजार दुचाकी आहेत. जिल्ह्यातील २० लाख वाहनांमध्ये साडेतेरा लाखांहून अधिक दुचाकीच असल्याचे आरटीओकडील आकडेवारीतून स्पष्ट होते.

पुणे-मुंबईसारखी स्थिती निश्चित, पण थोड्या वर्षांनंतर

सोलापूर शहरातून सध्या १६ हजारांहून अधिक रिक्षा धावतात. दुसरीकडे मालवाहतूक तीन-चार चाकी वाहने देखील १० हजारांवर आहेत. कारची संख्या ३५ हजारांवर असून शहरात पाच लाखांवर दुचाकी आहेत. वाहनांच्या प्रमाणात पार्किंगची सोय नसल्याने अनेकांची वाहने रात्री रस्त्यावरच लावलेली दिसतात. याशिवाय शहरातील रस्ते अरुंद असून रस्त्यांलगत अतिक्रमण, हातगाडे, यामुळे शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. जिल्ह्यातूनही विविध कामांसाठी वाहने सोलापुरात ये-जा करतात. वाहने वाढण्याचा वेग पाहता आणखी दहा वर्षांनी पुण्यासारखा वाहतूक कोंडीचा त्रास सोसावा लागेल हे निश्चित आहे. शहरातील वाहतुकीचे मार्ग अतिक्रमणमुक्त करून त्याची रुंदी वाढविणे हाच त्यावरील ठोस उपाय मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.