राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सोमवारी 6 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. असे असले तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.
मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सोमवारी 6 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. असे असले तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2 तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक 1 डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांनी लस घेतली होती का? तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. (21 Cases Of Delta Plus Variant In Maharashtra Says State Health Minister rajesh tope)
कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटअधिक धोकादायक मानला जातो. भारतात या व्हेरिएन्टचा शिरकाव झाल्याने चिंतेत वाढ होणार आहे. जीनोम सिक्वेंसिंगसाठी राज्यातून एकूण 7 हजार 500 नमुने पाठवण्यात आले होते, त्यांपैकी 21 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटआढळला आहे. डेल्टा व्हेरियंट कोरोना प्रतिबंधक लसीवर म्हणावा तसा प्रभावी नसल्याचं सांगितलं जातं. शिवाय जगभरातील अनेक देशांमध्ये हा नवा व्हेरिएन्ट आढळल्याने निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही डेल्टा व्हेरियंट हातपाय पसरवत असल्याचं दिसून आल्याने काही कठोर निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 नमुने तपासणीसाठी पाठवले. CSIR आणि IGIB या महत्त्वाच्या संस्थेची मदत यासाठी घेण्यात आली. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7 हजार 500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे सिक्वेंन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 प्रकरणं आढळून आली आहेत, असं टोपे म्हणाले आहेत.
या प्रकरणांबाबत आता इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का? त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का? याबाबत माहिती घेऊन त्यांच्या सहवासातील लोकांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.