Nanded : 'जवान'मधील 'त्या' प्रसंगाची नांदेडमध्ये पुनरावृत्ती; शासकीय रुग्णालयात २४ जण दगावली

new born baby found dead
new born baby found dead Sakal
Updated on

नांदेड - महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचे किती तीनतेरा वाजले हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अवघ्या २४ तासांत दोन डझन जण दगावले असून मृतांमध्ये १२ नवजात बालके आहेत.

new born baby found dead
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काय संबंध? स्थापनेवेळी ते...; शिंदे गटाचा सवाल

काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान यांचा जवान चित्रपट आला होता. त्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेक बालके दगावल्याचं दाखवलं होतं. तसच चित्रं आज नांदेडमध्ये पाहायला मिळालं.

दरम्यान औषधांचा पुरवठा वेळेत होत नसल्याचा आरोपही कऱण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी कऱण्यात आली आहे.

new born baby found dead
Maratha Reservation : "...मग मलाच एकट्याला का बोलता?"; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांचा मनोज जरांगेना सवाल

याबाबत शासकीय रुग्णालय, नांदेडचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे म्हणाले की, ७० ते ८० किमी परिसरात असं रुग्णालय नाही. त्यामुळे सर्व प्रकरचे गंभीर अवस्थेतील रुग्ण असतात. मागील २४ तासात लहान मुलांमध्ये ६ पुरुष जातीचे आणि ६ स्त्री जातीचे अशा १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर स्नेक बाईट, विषबाधा, असे १२ मृत्यू झाले आहे.

दरम्यान बदल्या झाल्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली आहे. परंतु, रुग्णसेवेत अडचण नाही. मागील काळात हाफकीन या संस्थेकडून औषधांची खरेदी होणार होती, ती होऊ शकली नाही. त्यामुळे थोडी अडचण झाली. रुग्णसंख्या वाढल्यामुळे बजेट कमी पडत असल्याचं वाकोडे यांनी म्हटलं.

याआधी ठाणे महानगरपालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. मृतांमध्ये 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते.

दरम्यान आता अशीच घटना नांदेडमध्ये घडली आहे. यावर एकनाथ शिंदे सरकार काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()