Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.९ टक्क्यांनी पाऊस कमी झाला असून, धरणसाठा १९.५५ टक्क्यांनी कमी आहे. अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, नाशिक, धुळे, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे.
टँकरचा विचार करता जळगाव, सोलापूर, बुलडाणा जिल्ह्यांतील टंचाईचे संकट स्पष्ट होते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे टंचाई बळावली असून, एका आठवड्यात १८ टँकरची भर पडली आहे. राज्यातील ३५० गावे आणि एक हजार ३४९ वाड्यांना ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (27 percent less rainfall in state this year maharashtra rain update news)
नाशिक जिल्ह्यात दोन, पुण्यात एक, साताऱ्यात १३, सांगलीत दोन, सोलापूरमध्ये एक टँकर वाढला आहे. राज्यात सर्वाधिक १४७ गावे आणि ९०५ वाड्यांना पुणे विभागात १५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल नाशिक विभागातील १४१ गावे आणि ३९२ वाड्यांची तहान १२७ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे.
जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून, (कंसात पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील टँकरची संख्या दर्शवते) : नाशिक-६७-४० (५८), जळगाव-१२-० (१४), नगर-६२-३५२ (५५), पुणे-३६-२७१ (४०), सातारा-७४-३९० (७४), सांगली-२६-१६९ (२९), सोलापूर-११-७५ (१०), छत्रपती संभाजीनगर-३०-४ (४१), जालना-२७-१८ (४३), बुलढाणा-५-० (५). गेल्या वर्षी ऑगस्टअखेर नगर जिल्ह्यातील नऊ गावे व १४ वाड्यांसाठी सात, सांगलीमधील एका गावासाठी एक अशा एकूण दहा गावे आणि १४ वाड्यांसाठी आठ टँकर सुरू होते.
नाशिकमध्ये सर्वांत कमी पाऊस
राज्यात सर्वांत कमी ५४.८ टक्के पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला आहे. या कालावधीत या जिल्ह्यात १२३.६ टक्के पाऊस झाला होता. जिल्हानिहाय आतापर्यंतचा नोंदवलेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्या वर्षी २७ ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाची जिल्ह्यातील टक्केवारी दर्शवते) : अकोला-६५.६ (९३.३), अमरावती-६३.९ (१०१.८), छत्रपती संभाजीनगर-६६.९ (१०९.४), जालना-६७.१ (१२१.१), लातूर-६७.५ (१०७.५), परभणी-५९.३ (९०.२), धुळे-६५.७ (११५.६), नंदूरबार-६२.४ (८७.६), नगर-६५.४ (११८.४), पुणे-६६.९ (११३.४), सातारा-६६.५ (१०२), सांगली-६५.७ (११३.९), कोल्हापूर-५५.५ (७२.४).
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राज्यातील जलसाठ्याची स्थिती
राज्यातील मोठ्या १३९, मध्यम २६० आणि लघू दोन हजार ५९५ अशा एकूण दोन हजार ९९४ धरणांत जलसाठा कमी आहे. मोठ्या धरणांमध्ये ७०.२० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हा साठा ९०.४२ टक्के होता. मध्यम धरणातील ५८.९० टक्के साठा असून, गेल्या वर्षी या काळात ६५.३८ टक्के, तर लघुप्रकल्पात आता ३८.५९ टक्के व गेल्या वर्षी ५५.०८ टक्के साठा राहिला....
धरणांमधील साठ्याचे प्रमाण
(आकडे टक्क्यांमध्ये दर्शवितात)
विभागाचे नाव धरणांची संख्या आताचा जलसाठा २७ ऑगस्ट २०२२ चा जलसाठा
नागपूर ३८३ ७७.८७ ८२.२७
अमरावती २६१ ६९.९७ ८६.८१
छत्रपती संभाजीनगर ९२० ३१.६१ ७५.०४
नाशिक ५३७ ५९.२६ ७७.९७
पुणे ७२० ६९.२२ ८८.४५
कोकण १७३ ८८.८२ ८७.९१
एकूण २,९९४ ६४.०५ ८३.६०
विभागनिहाय पावसाची टक्केवारी
विभागाचे नाव आताचा पाऊस २७ ऑगस्ट २०२२ चा पाऊस
कोकण १०१.९ १००.३
नाशिक ५९.४ १०३.३
पुणे ५८.९ ८८.९
छत्रपती संभाजीनगर ७७.६ ११७.८
अमरावती ८३.९ ११३.७
नागपूर ९३.३ १४१.२
राज्य ८५.३ ११२.२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.