राज्यात शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची जय्यत तयारी सुरू असली तरी अद्यापही तब्बल २७ हजार शाळांमध्ये वीजच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निम्म्याहून अधिक शाळांमध्ये अजूनही संगणक आणि इंटरनेटची साधी सुविधा नाही. केंद्रीय शिक्षण विभागाच्या ‘युडायस प्लस २०२१-२२’ या अहवालातून हे वास्तव उघड झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यात सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन चॅटबोट हजेरीचे नियोजन केले आहे; मात्र जर शाळांमध्ये वीजच नसेल तर ही हजेरी कशी होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे प्रमाण सर्वाधिक ७१.२ टक्के आहे. ४६ हजार ७२२ सरकारी शाळांमध्ये २०२०-२१ मध्ये आरोग्य तपासणी पार पडली. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हे प्रमाण ६६.४ टक्के आहे; तर अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील हे प्रमाण अनुक्रमे ६८.९ आणि ४८.३ टक्के एवढे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.