सोलापूर : जिल्ह्यातील सहा लाख १६ हजार ७६९ पुरुष मतदारांनी (३१.२८) तर पाच लाख १६ हजार ३९८ महिला (२७.५२) मतदारांनी दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. तृतीपंथीय ३१० पैकी २१ जणांनीच मतदान केले आहे. आता मतदानासाठी आणखी चार तासांचा अवधी शिल्लक आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी बार्शी, शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केलेल्या महिलांचेही मतदान तेवढेच आहे. दरम्यान, जिल्ह्यात १९ लाख ७१ हजार ८३१ पुरुष मतदार असून दुसरीकडे १८ लाख ७६ हजार ७२८ महिला देखील आहेत. अजूनही जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदारांपैकी २७ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी दर दोन तासाला ११ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढत आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी निश्चितपणे त्या त्या मतदारसंघाचे समिकरण बदलणारी ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात शांततेत मतदान सुरु आहे. पोलिस प्रमुखांचेही मतदानावर लक्ष आहे.
मतदारसंघ एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी
करमाळा ३,२८,९९४ ८९,९४५ २७.३४
माढा ३,५२,६९१ ९२,७९८ २१.५८
बार्शी ३,३७,४९९ १,१०,३९२ ३१.९६
मोहोळ ३,३१,४५८ १,०१,१४१ २७.७३
शहर उत्तर ३,२८,५७२ ९६,९२६ २८.७९
शहर मध्य ३,४६,६७७ ९९,१७३ २७.७४
अक्कलकोट ३,८३,४७९ १,२७,२२२ ३३.१८
दक्षिण सोलापूर ३,८२,७५४ १,१३,०२३ २८.२८
पंढरपूर ३,७३,६८४ ९०,६४९ २१.८०
सांगोला ३,३३,४९३ १,०५,३०६ २९.७८
माळशिरस ३,४९,५६८ १,०६,६१३ २६.८७
एकूण ३८,४८,८६९ ११,३३,१८८ २७.५२
मतदानाची टक्केवारी अशी...
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत : ५.१६ टक्के
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत : १५.६६ टक्के
सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत : २९.४४ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.