मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. दरम्यान कोकणातही या पावसामुळे नुकसान झालं होतं. पावसाने झोडपून काढल्याने दोन दिवसांपूर्वी कोकणातील रेल्वेचे वेळापत्रकात बदल करावा लागला होता. त्यानंतर हवामान विभागाने कोकण गोवा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
(Maharashtra Weather Updates)
कोकणातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्हामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिह्यातील कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात रिमझिम पाऊस पडला आहे. तसेच आजपासून तीन दिवसांपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागात पारा ४० अंशावर असताना काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून, तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
दरम्यान मराठवाड्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, विदर्भात अद्याप तापमानाचा पारा ४० अंशांवर स्थिर आहे. त्यानंतर आजपासून तीन दिवसात विदर्भात आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.