एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार यांनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत जात नवीन सरकार स्थापन केलं. यानंतर शिवसेनेत फुट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. यानंतर इतर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते हे पक्षांतर करू लागले. यामध्ये जास्त तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचं दिसून आलं आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील एकूण 3 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचेही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा केला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास असता तर हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल. आमच्या म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.