Milk Price Maharashtra : राज्यात 30 टक्के दुधात भेसळ; खुद्द दुग्धविकासमंत्र्यांनीच दिली खळबळजनक माहिती

दुधाला ३४ रुपये दर मिळावा, यासाठी नगरला उपोषण सुरू आहे.
Radhakrishna Vikhe-Patil
Radhakrishna Vikhe-Patilesakal
Updated on
Summary

दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे.

कऱ्हाड : दूध दराच्या (Milk Rate) प्रश्नावर मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. राज्यात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल, असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री कऱ्हाडला काही काळ थांबले होते. त्याचदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुधाला ३४ रुपये दर मिळावा, यासाठी नगरला उपोषण सुरू आहे, त्या प्रश्नावर मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘आंदोलनकर्त्यांशी मी चर्चा केली आहे. काही दूध संघ, काही खासगी संस्था सरकारचा आदेश पाळत नाही, अशी तक्रार आहे. त्यासाठी खासगी, सहकारी दूध संघांची बैठक घेतली.

Radhakrishna Vikhe-Patil
Satara : दुधात मिठाचा खडा! कमी दरामुळं शेतकऱ्यांचं बिघडलं अर्थकारण; दुग्धव्यवसाय दराअभावी अडचणीत

त्यास उपोषणकर्ते अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनाही बोलविले होते. मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. राज्यात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो, तरी दुधाला चांगला दर देता येईल.’’

Radhakrishna Vikhe-Patil
सांगलीला पाणी नेण्यासाठी वीज तोडा; 'कृष्णा सिंचन'चा महावितरणला आदेश, 46 गावांतील शेतकऱ्यांवर अन्याय?

..तर खासगी, सहकारी दूध संघाचे परवाने रद्द

दूध दरासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करतोय, असे सांगून मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘या प्रश्नासंदर्भात मी खासगी, सहकारी दूध संघांशी चर्चा करतोय. येत्या दोन-तीन दिवसांत अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, तरीही खासगी आणि सहकारी दूध संघ सरकारचे ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.