CM Eknath Shinde: CM शिंदेंची मोठी घोषणा; उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे.
350th Shivarajyabhishek Sohala 2023 CM Eknath Shinde
350th Shivarajyabhishek Sohala 2023 CM Eknath Shinde
Updated on

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे.

किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. (350th Shivarajyabhishek Sohala 2023 CM Eknath Shinde big announcement Udayanraje Bhosale Pratap gad )

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, प्रताप गड प्राधिककरण जाहिर करण्यात आलं आहे. तर या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

350th Shivarajyabhishek Sohala 2023 CM Eknath Shinde
Devendra Fadnavis : दिल्लीत होणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी केली घोषणा!

लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. असही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

350th Shivarajyabhishek Sohala 2023 CM Eknath Shinde
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल लागला! 'येथे' पाहा संपूर्ण माहिती

शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.