धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून आणखी एका तरुणानं संपवलं जीवन; खिशात चिठ्ठी सापडली अन्...

Maratha Reservation : फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील बारकू सांडू सोनवणे या 38 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on
Summary

बारकू सोनवणे यांना तातडीने फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

फुलंब्री : तालुक्यातील खामगाव येथे 38 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. बारकू सांडू सोनवणे (रा. खामगाव ता. फुलंब्री) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरील तरूणाच्या खिशात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केल्याची चिठ्ठी आढळून आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.