Shiv Sena Politics : 'असा' निर्णय घेतल्यास ते 40 आमदार अपात्र ठरतील; निकालापूर्वीच आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

हे सरकार टिकले तर मंत्रालयसुद्धा सुरत किंवा अहमदाबादला हलवतील.
Shiv Sena MLA Disqualification Case Aditya Thackeray
Shiv Sena MLA Disqualification Case Aditya Thackerayesakal
Updated on
Summary

आठ वर्षे आमच्यासोबत राहून मंत्री दीपक केसरकर माझ्यामुळे महाराष्ट्र सात वर्षे मागे गेला असा खोटा आरोप करीत आहेत.

उजळाईवाडी : आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतात की आपली बदनामी करून घेतात याकडे जगाचे लक्ष असून, डॉ. आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे निर्णय घेतल्यास ४० आमदार अपात्र होतील व भाजपच्या संविधानाप्रमाणे निर्णय घेतल्यास आम्ही बाद होऊ, असा दावा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील रोजगार आपल्या आवडत्या राज्यात पळवले जात आहेत. उद्‌घाटनाअभावी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (Pune International Airport) टर्मिनल बिल्डिंग व दिघा रेल्वे स्टेशन यासारखे अनेक प्रकल्प पडून आहेत. सध्या ‘व्हायब्रंट गुजरात’ चालू असल्याने त्यानंतरच महाराष्ट्रातील उद्‌घाटने सुरू होतील.’

Shiv Sena MLA Disqualification Case Aditya Thackeray
'वंचित'नंतर सांगली मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केला उमेदवार, कोणाला मिळाली संधी?

ते पुढे म्हणाले, ‘आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची कारवाई म्हणजे जे सत्यासोबत उभे राहतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही लढत राहू. आपल्या देशामध्ये ‘सत्यमेव जयते’ला महत्त्व असून ‘सत्तामेव जयते’ला नाही. बुलेट ट्रेनसाठी बीकेसीची जागा महाराष्ट्राने फुकट दिली; पण महाराष्ट्रावरच टोल लावला. याचा अर्थ आम्ही टोल भरायचा आणि यांनी सर्व फुकट घ्यायचे.

हे सरकार टिकले तर मंत्रालयसुद्धा सुरत किंवा अहमदाबादला हलवतील. आठ वर्षे आमच्यासोबत राहून मंत्री दीपक केसरकर माझ्यामुळे महाराष्ट्र सात वर्षे मागे गेला असा खोटा आरोप करीत आहेत. एवढं खोटं बोलून ते आरशात कसे पाहतात?’

Shiv Sena MLA Disqualification Case Aditya Thackeray
महायुतीचा धर्म पाळून आगामी निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त करू; मुख्यमंत्र्यांनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

दोन्ही जागा ‘इंडिया’तून जिंकू

‘गल्ली ते दिल्ली महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यावर लक्ष देणे आवश्यक असून, जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून जिंकणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.