महाराष्ट्रात लोकसभेत 45 खासदार अन् विधानसभेत 225 आमदार निवडून येतील; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना पूर्ण ऊर्जा देऊ.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on
Summary

काँग्रेसचे उमेदवार पाडणे व भाजपचे निवडून देणे, ही काळाची गरज आहे. २०२४ ला मोदी पंतप्रधान होणार, हे काळ्या दगडावरची रेघ आहे.

इस्लामपूर : ‘‘लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून येतील. विधानसभेच्या आखाड्यात इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना पूर्ण ऊर्जा देऊ. २२५ आमदार विधानसभेत येतील,’’ असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला.

येथे ‘घर चलो अभियान, महाविजय-२०२४’ या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, सत्यजित देशमुख, राजवर्धन निंबाळकर, शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट महाडिक, प्रवीण प्रभावळकर, सी. बी. पाटील, पृथ्वीराज पवार प्रमुख उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

बावनकुळे म्हणाले, ‘‘संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल एवढी ऊर्जा इस्लामपुरात निर्माण करू. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत शिराळा, इस्लामपूर व शाहूवाडी मतदार संघातील साडेचारशे महायोद्धे प्रत्येक घरात जाऊन मोदींचे नेतृत्व जनतेसमोर मांडणार आहेत. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मदत करणार आहेत. कोरोना लसीकरण, काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथे तिरंगा फडकावणे, राम मंदिर उभारणी, महिलांना आरक्षण हे फक्त मोदींच्या नेतृत्वातच शक्य झाले आहे.’’

Chandrashekhar Bawankule
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

सुरेश खाडे म्हणाले, ‘‘काँग्रेसचे उमेदवार पाडणे व भाजपचे निवडून देणे, ही काळाची गरज आहे. २०२४ ला मोदी पंतप्रधान होणार, हे काळ्या दगडावरची रेघ आहे.’’ निशिकांत पाटील म्हणाले, ‘‘पुढील निवडणुकीत खासदारही कमळाचा असेल आणि आमदारही. नगरपालिका मागील पाच वर्षांपूर्वी आपल्याच ताब्यात होती. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा आपलीच सत्ता असेल.’’ अशोक खोत यांनी प्रास्ताविक केले. सतेज पाटील यांनी आभार मानले.

Chandrashekhar Bawankule
खासदार गटाचा राष्ट्रवादीला धक्का; नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, माजी मंत्र्यांच्या गटाची 'वेट अँड वॉच' भूमिका

मोदीच पंतप्रधान

बावनकुळे म्हणाले, ‘‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेल्याने एकटे पडले आहेत. शरद पवार शेवटची लढाई लढत आहेत. शिल्लक कार्यकर्ते कुठे आहेत का, हे पाहत आहेत. निवडणूक जवळ येईल तसे त्यांच्याकडे झिरो दिसेल. इंडिया आघाडीला ४४० चा करंट बसेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.