मुंबई : कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढी एकादशीचा (Ashadi Ekadashi) सोहळा रंगणार असून, वारकऱ्यांना पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. एकादशीसाठी एसटी महामंडळाकडून श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल (Anil Parab) परब यांनी केली आहे. (Anil Parab On Ashadi Ekadashi Pandharpur)
सहा जुलै ते 14 जुलै दरम्यान या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. पंढरपूर येथील एकादशी सोहळ्यासाठी औरंगाबाद विभागातून 1 हजार 200, मुंबई 500, नागपूर 100 तर, पुणे विभागातून 1200 आणि नाशिक विभागातून 1 हजार बसेस सोडल्या जाणार असल्याचे परब यावेळी म्हणाले. याशिवाय अमरावती येथून 700 बसेस वारकऱ्यांसाठी धावणार आहेत.
असा असेल यंदाचा पायी वारी सोहळा
यंदाच्या आषाढी एकादशीच्या पायी वारीसाठी 21 जूनला आळंदीतून पंढरीकडे माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये (जि. सातारा) अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी असणार आहे. तर, दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकऱ्यांना वाहन पास दिले जाणार आहे.
असा असेल वारीचा कार्यक्रम
21 जून - संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान
22,23 जून - पुण्यात मुक्काम
24,25 जून - सासवड
26 जून - जेजुरी
27 जून - वाल्हे
28, 29 जून - लोणंद
30 जून - तरडगाव
1, 2 जुलै - फलटन
3 जुलै - बरड
4 जुलै - नातेपुते
5 जुलै - माळशिरस
6 जुलै - वेळापूर
7 जुलै - भंडीशेगाव
8 जुलै - वाखरी
9 जुलै - पंढरपूर
10 जुलै - आषाढी एकादशी
येथे होणार रिंगण सोहळा
पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.