Zika Virus: चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळले झिकाचे ५ रुग्ण; काळजी घेण्याचे आवाहन

zika virus
zika virussakal
Updated on

Zika Virus:  झिकाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाने महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबरपासून राज्यात झिकाचे ५ रुग्ण सापडले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

इचलकरंजीत झिकाचे २ रुग्ण सापडले. तर पुणे, कोल्हापूर आणि पंढरपूर येथे देखील प्रत्येकी एका रुग्णांची नोंद करण्यात आली.

देशात देखील झिकाचा संसर्ग वाढत आहे. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात झिकाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून  सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

झिकाची लागण झाल्यास...-

ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावेत. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मोफत आहेत. तसेच झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.

zika virus
Mumbai Crime News: मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याचार, ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

झिका व्हायरस लक्षणे कोणती?

झिकाची लक्षणे सहसा सौम्य असतात.झिका ची लागण झालेल्या 5 पैकी फक्त 1 व्यक्तीमध्ये लक्षणे दिसतात.  ताप, त्वचेवर लाल ठिपके, सांधेदुखी, डोळे लाल होणे, असे लक्षणे दिसतात. लक्षणे साधारणपणे दोन-तीन दिवसांपासून आठवडाभर टिकतात.नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. 

zika virus
Mumbai Ahmedabad Bullet Train: रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे स्टेरिंग ? जपानमध्ये घेणार ट्रेनिग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.