50 Khoke Rap Song: रॅपर राज मुंगासेचं बरं वाईट झालं? कुटुंबीयांची चिंता, अटकेपासून ठावठिकाणा नाही

50 Khoke Rap Song
50 Khoke Rap Songesakal
Updated on

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मंत्रीपद गमवावं लागलं. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतो.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गाणं राज मुंगासे या रॅपरने तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

50 Khoke Rap Song
सत्तसंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या खासदारांचं काय होणार? वाचा तज्ञ काय म्हणतात

या तक्रारी वरून रॅपर राज मुंगासे या तरूणाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आलं. मात्र या तरूणाला कोणत्या पोलिसांनी कोठून अटक केली याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळत नाही.

राज मुंगासे या तरूणाच्या भावाने पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्याला उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत त्याची तक्रार पोलिस घेत नाहीत. तसेच मुंबई पोलिसांना फोन वरून विचारना केली असता, ते सांगतात तो,

संभाजीनगरला अटक आहे. पण नेमक्या कोणत्या पोलिस स्टेशनला हे सांगत नाहीत. असा आरोप त्यांचा भावाने केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांना विनंती केली आहे की, "राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली.

50 Khoke Rap Song
सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court

पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.

त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे" दरम्यान राज मुंगासेच्या कुटुंबाला भिती वाटत आहे की, त्याचं काय बरं वाईट झालं की काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.