Maharashtra Politics : शिंदेंची साथ भाजपला अडचणीची? लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी BJP आग्रही

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी भाजप आग्रही? कारण, जनमत...
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

Latest Marathi News: लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. 'द हिंदू'च्या बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुढील वर्षी ‘एप्रिल-मे’मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणूकही घेण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. 'द हिंदू' च्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘द हिंदू’ने आपल्या बातमीत महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा विचार भाजपाच्या नेतृत्वाकडून सुरू आहे.

राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपाने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे. असे सांगण्यात आले आहे.

तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नुकतीच दिली आहे.

यासर्व घडामोडीनंतर राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. या प्रस्तावामागे भाजपची नेमकी खेळी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदे सोबतच्या युतीचा भाजपला कितपत फायदा

एकनाथ शिंदे यांच्या युतीचा भाजपला किती फायदा झाला हा विशेष मुद्दा उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदेंसोबत युती यामध्ये कितपत यश यासंदर्भात भाजपच्या मनात अद्याप साशंकता आहे. या युतीवेळी फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे १०५ आमदार असतानादेखील एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं.

फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारायला लागणं. यामुळे होणारी पक्षातील अस्वस्थता घुसमट. यासर्वामुळे राज्यात वर्चस्व कुणाचं हवं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील शिंदे सरकार अजूनही स्थिर नाही

गतवर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजपा अशी युती होऊन नवे सरकार स्थापन झाले होते.

दरम्यान, नऊ महिने उलटल्यानंतरही या सरकारला म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. दरम्यान, महाविकास आघाडीचेही कडवे आव्हान या सरकारसमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाने वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

जागावाटपावरून भाजप-शिंदे गटातील संघर्ष

विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागा आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचं वक्तव्य भाजपच्या बड्यानं नेत्यानं केलं आहे. शिंदे गटाला ४८ जागा देण्यात येणार असल्याचं म्हटले आहे. त्यामुळं यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. राज्यात भाजपने अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला आहे.

भाजपचे विधानसभेत सध्या १०५ सदस्य असून आठ अपक्ष आपल्याबरोबर असल्याने आपले ११३ आमदार आहेत. भाजप ६० मतदारसंघात काही वेळ हरला आहे किंवा जिंकला आहे. या जागांची संख्या १७३ होते.

त्यापैकी शिंदे गटाकडे असलेले १२ मतदारसंघ सोडले तरी अन्य मतदारसंघात भाजपला जिंकण्यासाठी आणखी ८ टक्के मते हवी आहेत. भाजपकडे ४३ टक्के मते असून आपल्याला ५१ टक्के मते मिळवायची आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Shahir: अंकुशबद्दल मला शंका कारण.. शाहीर साबळेंच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरी बद्दल राज ठाकरेंचे परखड मत

उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा धक्का

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आल्यावर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. खेडमधील सभा हे विशेष उदाहरण मानलं जात आहे.

निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह काढून घेतल्यापासून म्हणजेच शुक्रवारी रात्रीपासून उद्धव ठाकरे हे सातत्याने जनतेसमोर येत आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रीय यंत्रणांकडून कशी पायमल्ली सुरू आहे याचा पाढा सातत वाचत आहेत.

शिवसेना आणि ठाकरे हे गेल्या जवळपास साडेपाच दशकांचे समीकरण होते. ठाकरेविना शिवसेना हे प्रथमच घडत आहे. भाजपकडून कसा अन्याय करण्यात येत आहे हे दाखविण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत.

Maharashtra Politics
Eknath Shinde : Khed मधील सभेतून मुख्यमंत्र्यांची Uddhav Thackeray यांच्याविरोधात डरकाळी

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जनतेत काय प्रतिक्रिया उमटली आहे याचे भाजपकडून सर्वेक्षण केले जात आहे. उद्धव ठाकरे यांना किती सहानुभूती मिळते याचा अंदाज घेऊनच पुढील रणतीनी आखली जाईल.

शिवसेनेतील अंतर्गत वादात ठाकरे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या समर्थक मंत्री वा आमदारांनी पत्त्युत्तर द्यावे, अशी भाजपची योजना आहे. भाजपने या वादापासून पद्धतशीरपणे दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यातील पोटनिवडणुकीचा धक्का

नुकतचं पुण्यात पोटनिवडणुका पार पडल्या. कसब्यात मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र, कसब्यात ३० वर्षांचा भाजपचा गड कोसळला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला.

चिंचवडची जागा जिंकली असली तरी त्यात महाविकास आघाडीच्या बंडखोराचे मोठे योगदान असल्याचे निकालातून पुढे आले आहे. झालेल्या पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण पाहायाला मिळाली. मात्र, म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीत अपयश

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासूनची ही दुसरी महत्वाची निवडणूक होती. गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट भाजपच्या पदरी मोठी निराशाच आली.

पाच जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये फक्त एका जागेवर भाजपला यश मिळवता आले. दुसरीकडे नागपूर आणि अमरावती सारख्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते.

नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला. गाणार गेले 12 वर्षं या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. तर, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला.

भाजपचे डॉ. रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे या पराभवाची मोठी चर्चा झाली. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपला विजय मिळवता आला. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस बंडखोर सत्यजीत तांबेंच्या विजयाचं श्रेयही भाजपला आपलंच असल्याचं सांगावं लागलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()