राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : निविदा भरण्याचा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर हा कालावधी असून एक ऑक्टोबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj Statueesakal
Updated on
Summary

राजकोट किल्ल्यावर नौदलातर्फे ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता.

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट (ता. मालवण) किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने पात्र कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत.

निविदा भरण्याचा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर हा कालावधी असून एक ऑक्टोबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. नव्या पुतळ्यासाठी २० कोटींची तरतूद असून, कामाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. कणकवलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Construction Department) कार्यकारी अभियंत्यांनी ही निविदा प्रसिद्ध केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Shiv Sena Controversy : शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; इंगवलेंचा पवारांवर रोष, काॅल रेकॉर्डिंग व्हायरल

राजकोट किल्ल्यावर नौदलातर्फे ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. पुतळ्याच्या चबुतऱ्याचा आराखडा कोल्हापुरात चेतन पाटील या अभियंत्यांनी केला होता, तर पुतळा जयदीप आपटे या कारागिराने तयार केला होता. पुतळ्याचे अनावरण झाले, त्याचवेळी काही इतिहास अभ्यासकांनी या पुतळ्याविषयी आक्षेप नोंदवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा हा पुतळा नसल्याचा मुख्य आक्षेप होता.

अशातच २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेल्या या पुतळ्याची अशी अवस्था झालेली पाहून इतिहासप्रेमींसह शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. वाऱ्याचा वेग, निकृष्ट बांधकाम अशा अनेक कारणांनी हा पुतळा कोसळल्याचे सांगितले गेले. त्याचे राजकीय पडसादही मोठ्या प्रमाणात उमटले. त्याची दखल घेऊन पुतळ्याचा कारागीर जयदीप आपटे व कोल्हापुरातील चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
हाळवणकरांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार आवाडे BJP मध्ये करणार प्रवेश? सुपुत्राला मिळणार विधानसभेचं तिकीट?

या घटनेनंतर काही दिवसांतच याचठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा असा नवा पुतळा बसवण्याची घोषणा सरकारने केली होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी त्याची निविदा काढली जाईल, असेही सांगितले होते. त्यानुसार आज (ता. २४) या पुतळ्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. नोंदणीकृत व अनोंदणीकृत अशा दोन्ही कंत्राटदारांना या निविदा भरण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

अशी आहे निविदा

पुतळा उभारणी अंदाजे तरतूद सुरक्षा किंमत कालावधी

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज २० कोटी रुपये २० लाख रुपये सहा महिने

पुतळ्याची संरचना, अभियांत्रिकी बांधकाम

उभारणी, संचलन, देखभाल, दुरुस्ती करणे

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
तुम्हाला कानडी येतं का? नसेल तर शिकून घ्या...; शिक्षण खात्याचा अजब निर्णय, शिक्षकांना दिले उद्दिष्ट

निविदा कार्यक्रम

  • निविदा स्वीकारणे - २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

  • तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्याचा दिवस - २७ सप्टेंबर

  • बयाणा रकमेसह निविदा भरण्याची मुदत - १ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी सहापर्यंत

  • सिलबंद निविदा उघडणे - एक ऑक्टोबर २०२४ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी

आयुर्मान 100 वर्षे

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्या धर्तीवर उभारला आहे, तेच सर्व निकष ठेवून राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार आहे. यात यावेळी कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्याने ५०० पेक्षा जास्त पानांची निकष असणारी निविदा तयार केली आहे. नव्या पुतळ्याचे आयुर्मान सुमारे १०० वर्षे असणार आहे. दहा वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करायची आहे. तीन फुटांचे फायबर मॉडेल तयार करून ते कला संचालनालयाकडून मंजूर करून घ्यावयाचे आहे. आयआयटी पवई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अनुभव असणाऱ्या व्यक्तींना हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.