सोलापूर : राज्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा जोर धरू लागला असून ओमिक्रॉनचा (Omicron) विळखाही घट्ट होऊ लागला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर आता प्राधान्याने १५ ते १८ वर्ष वयोगटातील ६०.१३ लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस (Covaxin) टोचली जाणार आहे. त्याची सुरवात सोमवारपासून (ता.३) होणार आहे. त्यासाठी ६५० विशेष केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. (650 special centers in Maharashtra for vaccinating students it will be available on the spot)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत १५ वर्षांवरील मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ३ जानेवारीपासून लस टोचली जाणार आहे. कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो तर कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस २८ दिवसांनी देता येतो. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली आहे. सध्या राज्यात कोव्हॅक्सिनचे ४५ लाख डोस आहेत.
नियोजित केंद्रांशिवाय शाळेतही लसीकरण शिबिरे घेता येतील का? यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. त्यामध्ये विशेषत: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांना आधारकार्डवरुन जागेवरच लस टोचली जाईल, असेही सांगण्यात आले.
याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्यातील जवळपास ६० लाख विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असून तीन महिन्यांत ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.