Maharashtra : राज्यात 73 आश्रमशाळांमध्ये ‘विज्ञान केंद्र’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी

ashram school file photo
ashram school file photoesakal
Updated on

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : राज्यातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय आश्रमशाळा ‘आदर्श’ म्हणून तयार करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

त्यादृष्टीने २५० आश्रमशाळा आदर्श (मॉडेल) घोषित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७३ आश्रमशाळांमध्ये ‘विज्ञान केंद्र’ उभारले जाणार आहेत. ही योजना एका वर्षात पूर्ण करावयाची आहे. ७३ पैकी नाशिक अपर आयुक्तालयातील ३० आश्रमशाळांचा यात समावेश आहे. (73 ashram schools in state have science centre maharashtra news)

आदिवासी विकास विभागांतर्गत ४९७ शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. आधुनिक काळातील बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक असून, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे गरजेचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व ७३ विज्ञान केंद्राची उभारणी प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.

निवड झालेल्या २५० आदर्श आश्रमशाळांपैकी ७३ आश्रमशाळांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. शासकीय आश्रमशाळा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करत असताना याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, कला व क्रीडा विभाग, अद्ययावत भोजनालय, सभागृह असणार आहे. या अत्याधुनिक सुविधांसोबतच या ७३ आश्रमशाळांमध्ये विज्ञानविषय माहिती देणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली जाईल.

यात अंतराविषयक बाबी, यंत्रशाळा, टेलिस्कोप आदींचा समावेश असणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या आश्रमशाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ashram school file photo
Maharashtra News: राज्यात 6 ठिकाणी भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा; स्थानिक वंशावळीच्या गाय-म्हशींवरील घटीवर उपाय

तसेच या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल. ७३ विज्ञान केंद्र उभारण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी आराखडा आदिवासी विकास विभागाने तयार करून त्यास मान्यता घ्यावी, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. याकरिता आदिवासी विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अपर आयुक्तालयनिहाय आश्रमशाळा

नाशिक - ३०

ठाणे - १८

अमरावती - १३

नागपूर - १२

जिल्ह्यातील १३ आश्रमशाळा

ठाणापाडी, शिरसगाव, तोरंगण (त्र्यंबकेश्वर), कोहोर (पेठ), ननाशी, नाळेगाव (दिंडोरी), मुंढेगाव (नाशिक), कनाशी, चणकापूर, मोहनदरी (कळवण), सराड (सुरगाणा), दहिंदुले व साल्हेर (बागलाण).

ashram school file photo
Maharashtra News : राज्यातील कारागृहांसाठी नव्याने 2 हजार पदनिर्मिती; नाशिकमध्ये नवीन प्रादेशिक कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.