शैक्षणिक प्रवेशाच्या चिंतेने कास्ट व्हॅलिडीटीसाठी 7652 विद्यार्थ्यांचे अर्ज! सुटीतही कार्यालय सुरू; दोन महिन्यांत 3922 विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडीटी

जात पडताळणी समितीची कार्यालये सुटीतही सुरू ठेवण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ६५२ विद्यार्थ्यांनी दोन महिन्यात कास्ट व्हॅलिडीटीसाठी अर्ज केले असून त्यातील तीन हजार ९२२ विद्यार्थ्यांना समितीने २५ ते ५० दिवसांत जात वैधता प्रमाणपत्रे वितरित केली आहेत.
solapur
caste validity and caste certificateesakal
Updated on

सोलापूर : सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी कास्ट व्हॅलिडीटी आवश्यक असून त्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना त्या प्रवर्गातून प्रवेश मिळत नाही. या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समितीची कार्यालये सुटीतही सुरू ठेवण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ६५२ विद्यार्थ्यांनी दोन महिन्यात कास्ट व्हॅलिडीटीसाठी अर्ज केले असून त्यातील तीन हजार ९२२ विद्यार्थ्यांना समितीने २५ ते ५० दिवसांत जात वैधता प्रमाणपत्रे वितरित केली आहेत.

सोलापूरच्या जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष बी. जी. पवार यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याच्या समितीचाही पदभार आहे. राज्यातील आणखी २३ जात पडताळणी समित्यांचीही अशीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओबीसी, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी व्हॅलिडीटी सादर करण्यासाठी सहा महिने मुदतवाढ दिली आहे.

एससी, व्हिजेनएनटी, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मात्र मुदतवाढ नसल्याने त्यांना प्रवेश घेताना व्हॅलिटीडी द्यावीच लागत आहे. त्यामुळे समित्यांच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने एससी, व्हिजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे दिली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ९९० विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये तर दोन हजार ६६२ विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये कास्ट व्हॅलिडीटीसाठी अर्ज केले आहेत.

सध्या समितीकडे पाच हजार ५८५ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. समितीकडे दररोज अडीच हजार प्रकरणे दाखल होत असल्याने रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावे लागत असल्याची स्थिती आहे.

मुदतवाढ नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने व्हॅलिडीटी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सुटीतही कार्यालय सुरू ठेवून कास्ट व्हॅलिडीटी वितरित केली जात आहे. दोन महिन्यांत चार हजारांपर्यंत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एसबीसी, एससी, व्हिजेएनटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने व्हॅलिडीटी दिली जात असून उर्वरित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने व्हॅलिडीटी सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तरीपण, प्रकरणांची संख्या पाहून सर्व प्रवर्गातील प्रकरणे निकाली काढली जात आहेत.

- सचिन कवले, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

‘एसईबीसी’ प्रवर्गाचे २९६३ अर्ज

मराठा समाजाला राज्य सरकारने ‘एसईबीसी’तून १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार मराठा समाजातील दोन हजार ९६२ विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी कास्ट व्हॅलिडीटी मिळावी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केले आहेत. जुलैमध्ये १८९० तर ऑगस्टमध्ये १०७३ अर्ज समितीकडे प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.