राज्यात दररोज ८ शेतकऱ्यांची आत्महत्या; ७ महिन्यांत १७१७ आत्महत्या; ७७३ कुटुंबांना मदत नाहीच

जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाभोवती खासगी सावकारकीसह अन्य अडचणींचा पाश दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात राज्यात दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात दररोज ८ शेतकऱ्यांची आत्महत्या; ७ महिन्यांत १७१७ आत्महत्या; ७७३ कुटुंबांना मदत नाहीच
Updated on

सोलापूर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाभोवती खासगी सावकारकीसह अन्य अडचणींचा पाश दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात राज्यात दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

महिनानिहाय आत्महत्या (जुलै २०२२ ते जानेवारी २०२३)

  • महिना आत्महत्या

  • जुलै २१४

  • ऑगस्ट २९७

  • सप्टेंबर २७३

  • ऑक्टोबर २६८

  • नोव्हेंबर २३८

  • डिसेंबर २१५

  • जानेवारी २१२

  • एकूण १७१७

सातशे आत्महत्यांची चौकशी पेन्डिंग

शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तो शेतकरी होता का, त्याने आत्महत्या का केली, शासकीय मदतीसाठी त्या शेतकऱ्याचे कुटुंब पात्र आहे का, याची पडतळणी कृषी व महसूल विभागाकडून पडताळणी केली जाते. त्यानंतर संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून दोन लाखांची मदत दिली जाते. मात्र, जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात आत्महत्या केलेल्या तब्बल ६८० प्रकरणांची अजूनही चौकशी झालेली नाही. त्यामुळे घरातील कर्ता जावूनही त्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळू शकलेली नाही.

आठ जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त

एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ‘आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ होईल, अशी ग्वाही दिली. मात्र, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, यवतमाळ, बुलढाणा व वर्धा या आठ जिल्ह्यांमध्ये मागील सात महिन्यांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()