Onion Subsidy: शेतकरी, निराधारांची यंदाची दिवाळी गोड! राज्यात कांदा अनुदानासाठी 'इतके' कोटी मंजूर

Onion Subsidy
Onion Subsidyesakal
Updated on

Onion Subsidy : फेब्रुवारी-मार्चमध्ये सरकारने कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या अनुदानातील शिल्लक ८४ कोटी एक लाख रुपयांची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही समावेश आहे. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील निराधारांना ३ कोटी ८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात येणार असल्याने दोघांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले होते. (84 crore have approved for onion subsidy in state maharashtra news)

अनुदानापोटी पाचशे पन्नास कोटी इतकी रक्कम पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून सदर चारशे पासष्ट कोटी, नव्व्यान्नव लाख वितरीत करण्यास यापूर्वी वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

कांदा अनुदान वितरणासंदर्भात आयसीआयसीआय बँकेकडून दोन टप्प्यात ४५२ कोटी २५ लाख ६८ हजार ६९२ इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. तांत्रिक बाबींमुळे देयक नाकारलेल्या व कार्यवाही सुरू असलेल्या नोंदीसाठी २४ कोटी ९२ लाख १९ हजार ७६२ इतकी रक्कम अदा करणे बाकी आहे.

पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पाचशे पन्नास कोटी रुपये या रकमेपैकी ८४ कोटी, एक लाख इतका उर्वरित निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने नुकतीच मान्यता दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

लाभार्थ्यांचे होणार चावडीवाचन...

पात्र लाभार्थींच्या यादीचे संबंधित ग्रामसभा/चावडी येथे वाचन करावे. ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिध्द करावी. अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. अनुदान वितरीत करताना प्रकरणवार शहानिशा करून तक्रारी होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.

Onion Subsidy
Onion market : कांदा पुन्हा दीड हजारांनी गडगडला; आवक घटूनही फटका; उत्पादक वाऱ्यावर

पात्र प्रस्तावाची तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी छाननी करून ती यादी पणन संचालक, पुणे यांनी अंतिम केलेल्या यादीनुसार अनुदान थेट बँक हस्तांतरणद्वारे लाभार्थीच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल.

निराधारांना ३ कोटी ८१ लाख मिळणार

बागलाण तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेंर्तगत सुमारे साडेनऊ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना जुलै ते सप्टेंबर अखेरचे सुमारे ३ कोटी ८१ लाख ८२ हजार ६०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. शासनाकडून दरमहा अनुदान मिळत नसल्याने सरासरी तीन महिन्यांचे एकत्रित अनुदान डीबीटीद्वारा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते.

याकामी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार श्रद्धा बागराव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे शेखर अहिरे, एस. के. भोईर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.‘संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाटपाची तालुक्यात तातडीने कार्यवाही केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या अनुदान वाटपाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे असे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले.

निराधार योजनेची स्थिती

* तालुक्यातील लाभार्थी : ९ हजार ६२४

* मिळणारी पेंशन : एक हजार ५०० रूपये

* वाटप अनुदान : ३ कोटी ८१ लाख रूपये

Onion Subsidy
Onion Subsidy News : कांदा अनुदानापासून 619 शेतकरी वंचित; पडताळणीअंती ठरविले अपात्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.