Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

Cases of new Covid: देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
Covid
Covid
Updated on

मुंबई- जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रादूर्भाव वाढला आहे. यापूर्वी JN.1 व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता KP.2 व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. ताज्या माहितीनुसार, या व्हेरियंटने राज्यातही पाय पसरले आहेत. राज्यात एकूण ९१ रुग्ण आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये KP.2 कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आलेत, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता.

Covid
Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण, लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे आणि ठाणे सोडून सात रुग्ण अमरावती आणि औरंगाबादमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबईमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही.

Covid
कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.